होंडाचे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह जागरूकता अभियान रत्नागिरीमध्ये दोन हजारपेक्षा जास्त महाविद्यालयीन तरुण आणि शालेय विद्यार्थ्यांनी होंडासह घेतले #दसेफ्टीप्रॉमिस

रत्नागिरी– सुरक्षितपणे वाहन चालवण्याची सवय रुजवण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने रत्नागिरीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह जागरूकता अभियानाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम व्हीपीएम महर्षी परशुराम कॉलेज ऑफर इंजिनियरिंग, वेळणेश्वर, चिपळूण आणि एसएसटीएम विद्यालय, चिपळूण, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता.

रस्ते सुरक्षेस होंडाचे जागतिक प्राधान्य आहे. तरुणांमध्ये सुरक्षितपणे वाहन चालवण्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी होंडाने जानेवारी २०१९ मध्ये नवे राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह जागरूकता अभियान सुरू केले. या उपक्रमाद्वारे होंडाने दर महिन्याला 15000 तरुण विद्यार्थी आणि 10 महाविद्यालयांमधील प्रौढांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. होंडा टुव्हीलर्स इंडियाच्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह जागरूकता अभियानाची सुरुवात झाल्यापासून हा उपक्रम रत्नागिरीसह 29 शहरांत विस्तारला असून त्याद्वारे आतापर्यंत 51000. तरुण आणि प्रौढांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

होंडा टुव्हीलर्स इंडियाच्या रत्नागिरीतील चार दिवसीय उपक्रमाने २ हजार सहभागींना ‘सुरक्षा सर्वांसाठी’ या ब्रीदवाक्याअंतर्गत रस्ते सुरक्षा जागरूकता पसरवली.

या उपक्रमाबद्दल होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या ब्रँड आणि कम्युनिकेशन विभागाचे उपाध्यक्ष श्री. प्रभू नागाराज म्हणाले, ‘सुरक्षेस होंडाचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि तोच आमच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा गाभा आहे. ही बांधिलकी आणखी दृढ करण्यासाठी आम्ही मुले व प्रौढांमध्ये सुरक्षितपणे वाहन चालवण्याची सवय रूजावी यासाठी रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय रस्ते सुरक्षा जागरूकता अभियान सुरू केले. या भव्य अभियानाद्वारे महाविद्यालयीन तरुण विद्यार्थ्यी खेळकर मार्गाने आवश्यक प्रशिक्षण घेत आहेत आणि होंडासह #दसेफ्टीप्रॉमिस घेत आहेत. तरुण चालकांना सुरक्षेच्या योग्य सवयींची माहिती व्हावी आणि त्यांच्यामध्ये या सवयी रुजाव्यात हे आमचे ध्येय असून पुढे हा उपक्रम भारतभर नेला जाणार आहे.’

रस्ते सुरक्षेसारख्या गंभीर विषयाचे शिक्षण जास्त मजेदार करण्यासाठी होंडाने अगदी चार वर्ष वयापासूनच्या विविध वयोगटासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले होते.

· ४ ते ५ वर्षाच्या मुलांना चित्रे व कॉमिक्सच्या मदतीने रस्त्यावर असताना काय करावे व काय करू नये हे शिकवण्यात आले.

· होंडाच्या रस्ते सुरक्षासंदर्भात खास प्रशिक्षण घेतलेल्या मार्गदर्शकांनी मुलांना शाळेच्या बसमधून प्रवास करताना आणि सायकल चालवताना काय करावे आणि काय करू नये याचे शिक्षण दिले.

· ९ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांना सायकल सुरक्षितपणे कशी चालवावी किंवा दुचाकीवर मागे बसताना कोणती सुरक्षित साधने वापरावी हे सांगण्यात आले. हे शिक्षण मजेदार व व्यवहार्य बनवण्यासाठी मुलांना खास आयात केलेल्या सीआरएफ५० मोटरसायकल्सवर शिकण्याची संधी मिळाली.

· १३ ते १७ वर्ष वयोगटातील मुले तसेच शिक्षकांना सुरक्षितपणे वाहन चालवण्याचे धडे देण्यात आले.

· १६ वर्षावरील मुलांसाठी होंडाच्या रस्ते सुरक्षासंदर्भात खास प्रशिक्षण घेतलेल्या मार्गदर्शकांनी खास रायडर प्रशिक्षण उपक्रम आयोजित केला होता.

· याशिवाय होंडाने रस्ते सुरक्षेवर आधारित असलेले खेळ, कोडी यांचे दैनंदिन आयोजन केले, ज्यामुळे सुरक्षित वाहन चालवण्याचे प्रशिक्षण आणखी मजेदार बनले.

होंडाची रस्ते सुरक्षेप्रती सीएसआर बांधिलकी

होंडासाठी रस्ता सुरक्षेस प्रथम प्राधान्य आहे. भारतातही होंडा २०११ मध्ये झालेल्या आपल्या स्थापनेपासून रस्ता सुरक्षेचा प्रचार करत आहे आणि आतापर्यंत २५ लाख भारतीयांपर्यंत रस्ता सुरक्षा जागरूकता पसरवली आहे. आज भारतीय नागरिक होंडाच्या भारतातील १४ दत्तक ट्रॅफिक पार्क्समध्ये (दिल्ली, जयपूर, चंदीगढ, भुवनेश्वर, कटक, येवला. हैद्राबाद, इंदौर, लुधियाना, कोईम्बतूर, तिरूचिरापल्ली, कर्नाल आणि ठाणे) आयोजित केल्या जाणाऱ्या सुरक्षित प्रवास आणि प्रशिक्षण उपक्रमांच्या मदतीने स्वतंत्र व सुरक्षित चालक बनत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *