होळी साजरा करा सोनी सबच्या कलाकारांसोबत

परेश गणात्रा (‘बाकरवडी’तील महेंद्र ठक्कर)
माझ्यासाठी होळी म्हणजे पूर्ण सुट्टी. मी या उत्सवासाठी पाणी वाया घालवत नाही. लोक ज्याप्रकारे होळी खेळतात, त्यात या उत्सवाची खरी आत्मीयता नसते. तथापि, मी लहानपणापासून अगदी वीस वर्षांचा होईपर्यंत होळी खेळलो. नंतर मात्र मला अशाप्रकारे होळी खेळण्याचे हानिकारक प्रभाव मला समजले. मी आता गुलालाचा टिळा लावून माझ्या मित्रांसोबत होळी साजरी करतो. नंतर खात-पित एकत्र गप्पा मारत त्यांच्याबरोबर वेळ घालवतो.
माझ्या मते, होळी आपल्या कुटुंबासह एकत्रितपणे साजरा करण्या्चा आणि एकमेकांना आनंद वाटण्याचा सण आहे. जर या दिवशी तुमची सोबत मिळाल्याळने लोक खूश होत असतील, तर हाच होळी किंवा इतर कोणत्याही सणाचा खरा अर्थ आहे.
पारस अरोरा (‘बावले उतावले’मधील गुड्डू)
माझ्यासाठी, होळी म्हणजे असा उत्सव आहे, ज्यामुळे कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद पसरतो, तसेच भरपूर मिठाई खाणे खासकरुन माझ्या आवडत्या, गुंजिया. मला आठवते की, माझ्या लहानपणी मी या सणासाठी इतका उत्साही होतो की, मी होलिका दहनसाठी ४ वाजता कुटुंबियांसोबत उठायचो आणि त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी सर्व प्रकारचे वेगवेगळे रंग गोळा करायचो.

आता मात्र आम्ही होळीला फारच कमी रंग खेळतो, कारण हल्ली त्यात अनेक घातक रासायनिक घटक असतात. मी सर्वांना आनंदी, रंगमय आणि सुरक्षित होळीच्या शुभेच्छा देतो. आपला दिवस आपले कुटुंब व मित्रांसोबत घालवा आणि होळीच्या स्वादिष्ट मिठाईचा आस्वााद घ्या.
अक्षय केळकर (‘भाकरवडी’तील अभिषेक)
होळीबद्दलची माझी कल्पना खूप वेगळी आहे, मला रंगांची होळी किंवा लाकूड जाळणे आवडत नाही. मी पुरण पोळी आणि करंजीसारख्या मिठाई खाऊन हा उत्सव साजरा करतो. अगदी सुरुवातीपासूनच मी होळीच्या दिवशी नेहमीच घरी राहिलो आहे, कारण रस्त्यावर सर्वत्र विखुरलेले प्लास्टिक, पाणी वाया घालवलेले आणि झाडे तोडून जाळताना पहिले की, मला वाईट वाटायचे. मला वाटते की, आपण सण साजरे करावेत पण पर्यावरणाची काळजी घेणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे.
तर, होळीला मी सर्वांना विनंती करतो की प्लास्टिक, खराब रंगांचा वापर करून किंवा पाणी वाया घालवून पर्यावरणाला प्रदूषित न करता त्याऐवजी, मिठाई खाऊन आणि आपल्या कुटुंबासह व प्रियजनांसह वेळ घालवून या सणाचा आनंद घ्या.
कृष्ण भारद्वाज (‘तेनाली रामा’मधील रामा)
होळी म्हणजे रंगीत आकाश, हवामानातला बदल, मोसमी फळे आणि घरी बनवलेले आईच्या हातचे पदार्थ. एकूणच सांगायचे तर ‘आपल्या शत्रूला रंगवा आणि त्यांच्याबरोबरही मैत्री करा’ असा हा सण आहे. या उत्सवात मला काहीसे नवीन आणि छान वाटते. माझ्या लहानपणी, आम्ही भरपूर रंग खेळायचो. मोठी मुले आमच्यावर घाणेरडे रंग टाकायची, आता ते दिवस आठवून मला गंमत वाटते. मात्र आता मी रंगाची होळी खेळत नाही, त्यापेक्षा चित्रपट पाहतो आणि होळीच्या खास स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतो.

मी सर्वांना सांगू इच्छितो की, सुरक्षित आणि स्वच्छ होळी खेळा. आपल्या पालकांसोबत भरपूर वेळ घालवा आणि त्यांना प्रेम व प्राधान्य द्या. आपल्या मित्रांसह आणि प्रियजनांबरोबर धमाल करा.
सिद्धार्थ निगम (‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’मधला अलाद्दिन)
होळी हा धमाल करण्याचा, बागडण्याचा, कुटुंब व मित्रांसोबत साजरा करण्याचा सण आहे. या दिवसाचा खरा आनंद आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवून एकाकीपणा दूर करण्याात आणि आपले जीवन रंगीत बनविण्या,त आहे. म्हणून मी होळी माझ्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत साजरी करतो. तसेच मला गुंजिया अतिशय आवडते, त्यामुळे गोड गुंजिया बनवायला आईला मदत करतो. तसेच, होळीच्या दिवशी मला प्रत्येकाला रंग लावायला आवडते.
मी माझ्या सर्व प्रेक्षकांना सकारात्मकता आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आनंदी व सुरक्षित होळीच्या शुभेच्छा देतो. आपल्या कुटुंबासह आणि आपल्या सभोवतालच्या प्रत्येकासह दिवस मजेत घालवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *