हिंदु राष्ट्रासाठी संप्रदायांनी व्यापकता अंगीकारावी ! – पूज्य संतश्री (डॉ.) संतोषजी महाराज, महाराष्ट्र

रामनाथी (गोवा) – साधना आणि धर्मप्रसार यांचा सुंदर ताळमेळ अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात पहायला मिळत आहे. अधिवेशनस्थळी आल्यावर हिंदु धर्माची काळजी करणारे कोणीतरी आहे, हे पाहून आनंद वाटला. आर्थिक, तसेच अन्य कारणांमुळे सिंधी समाज राष्ट्र-धर्म कार्यापासून काही काळ दूर गेला होता; मात्र सध्या परिस्थिती पालटली असून हा समाजही राष्ट्र-धर्म कार्यात अग्रेसर आहे. हिंदु राष्ट्र तर येणारच आहे; मात्र त्यासाठी संप्रदायांना संकुचितता सोडून व्यापक होऊन कार्य करावे लागेल, असे आवाहन अमरावती (महाराष्ट्र) येथील शिवधारा आश्रमाचे पूज्य संतश्री (डॉ.) संतोषजी महाराज यांनी केले. 3 जून या दिवशी श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सहाव्या दिवशी ‘सिंधी समाजात संस्कृती रक्षणासाठी केलेले प्रयत्न आणि त्यास मिळालेले यश’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे बिहार राज्य समन्वयक श्री. संजय सिंह यांनी अधिवेशनात झालेल्या ठरावांचे वाचन केले. या ठरावांना ‘हर हर महादेव’च्या गजरात उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!