हिल रायडर्स व संवेदना फौंडेशनतर्फे १७ फेब्रवारीला “पन्हाळागड प्रदक्षिणा”मोहीम

कोल्हापूर/ प्रतिनिधी -महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनातून पन्हाळा गडप्रदक्षिणा चे आयोजन करण्यात आलय. हिल रायडर्स एडवेंचर्स आणि संवेदना सोशल फाउंडेशनच्या वतीने गिर्यारोही व इतिहासप्रेमींना ‘किल्ले पन्हाळगड प्रदक्षिणा’ ही आगळीवेगळी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेमध्ये दहा वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतच्या वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात. या मोहिमेचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती हिल रायडर एडवेंचर्सचे प्रमोद पाटील आणि संवेदना फाउंडेशन चे राहुल चिकोडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी जीवन चरित्रातील रोमांचकारी घटनांचे साक्षीदार म्हणजे हे गडकोट किल्ले आहेत. महाराष्ट्राचे वैभव असणारे हे किल्ले आता मोडकळीस आले आहेत. हे नेस्तनाबूत होण्याआधीच यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आत्ताच्या पिढीच्या मनात ही संवर्धनाची भावना जागृत व्हावी यासाठी ही गडप्रदक्षिणा आयोजित केले असल्याचे संयोजकांनी सांगितले. त्याचवेळी गडाच्या तटाखालून एकूण अकरा किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. यामध्ये जाताना प्लास्टिक कचरा स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. ही प्रदक्षिणा म्हणजे केवळ ट्रेकिंग नसून पिढीस कृतिशील प्रेरणा देणारी मोहीम आहे. यामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक मिळणार आहे. गड प्रदिक्षणा चे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मागील वर्षी 4,500 हून अधिक लोकांनी ही प्रदिक्षणा यशस्वीपणे पूर्ण केली. राज्यात अशा प्रकारची गडप्रदक्षिणा मोहीम पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. मागील वर्षी मोहिमेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. यावर्षी एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची तयारी केली आहे. यामुळे ही मोहीम यशस्वी होण्यासाठी शंभर स्वयंसेवक मेहनत घेत आहेत. या मोहिमेची सुरुवात पन्हाळगडावरील वीर शिवा काशीद यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून होणार आहे, तरी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!