हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशन तर्फे पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे तीन टप्प्यात आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी
हिल रायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनच्या वतीनं गेल्या चार वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या पन्हाळगड ते पावनखिंड या मोहिमेस शिवप्रेमींसह निसर्गप्रेमींचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे यावर्षी ही पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिम दिं.६ व ७ जुलै व दिं.२० व २१जुलै आणि दिं.२७व२८जुलै अशी
तीन टप्प्यात होणार असून या ५६ व्या पदभ्रमंती मोहीमत समाजातील शिवप्रेमीसंह निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असं आवाहन हिल रायडर्स फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील आणि संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी पत्रकार परिषदेत केलय.
राज्यातील युवक-युवतींना इतिहासाची ओळख व्हावी या हेतूने वीर शिवा काशिद आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या ३५९व्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाशी निगडित साहसी राज्यस्तरीय पन्हाळागड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीमेचे आयोजन हिल रायडर्स फौंडेशनच्या वतीनं तीन टप्प्यात करण्यात आलय.
तर ही पदभ्रमंती मोहीम पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली होत असून सहसंयोजक म्हणून संवेदन फौंडेशन असल्याच प्रमोद पाटील आणि राहूल चिकोडे यांनी स्पष्ट केलं.तर
या मोहिमेचा पहिला टप्पा दिं.६ व ७जुलै असून दुसरा टप्पा दिं.२० व २१जुलै तर तिसरा टप्पा दिं.२७व२८जुलै आहे. या मोहिमेसाठी शालेय विद्यार्थ्यांना न २००रुपये तर सर्वांसाठी ३००रुपये नाममात्र शुल्क असणार आहे. यामध्ये नाष्टा, जेवण ,चहापाणी तसेच मुक्काम अशी सोय करण्यात येणार आहे. दरम्यान पहिल्या दिवशी सकाळी ७ वा. पन्हागडावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापाशी जमा होवून मान्यवरांच्या हस्ते बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल.त्यानंतर राजदिंडीमार्गे पावनखिंडीकडे प्रयाण करण्यात येणार आहे. तरी समाजातील शिवप्रेमी व निसर्गप्रेमींनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी हिल रायडर्स फौंडेशन आणि संवेदना फौंडेशनशी संपर्क साधण्या्च आवाहन यावेळी प्रमोद पाटील आणि राहूल चिकोडे यांनी केलय.
पत्रकार परिषदेला युवराज सांळुखे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!