एचडीएफसी लाईफकडून ‘एचडीएफसी लाईफ संचय प्लस’ योजनेची सुरुवात

मुंबई, 19 मार्च, 2019: भारतातील एक आघाडीची खाजगी इन्शुरन्स कंपनी समजल्या जाणार्‍या एचडीएफसी लाईफकडून अलिकडेच एचडीएफसी लाईफ संचय प्लस योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ही योजना म्हणजे एक नॉन पार्टिसिपेटिंग आणि नॉन लिंक्ड सेविंग इन्शूरन्स प्लॅन आहे. हा प्लॅन आर्थिक नियोजनातील अनिश्‍चितता टाळण्यासाठी आणि उत्पन्नाची हमी मिळवून देण्यासाठी खास प्रकारे डिझाईन करण्यात आला आहे.
एचडीएफसी लाईफ संचय प्लसकडून ग्राहकांना या श्रेणीतील सर्वोत्तम परतावा मिळवून देण्याचा दावा केला जात आहे. या प्लॅनमधून ग्राहकांना चार प्रकारचे फायदे मिळू शकतात. आयुष्याच्या विविध टप्प्यांमध्ये आर्थिक गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची हमी देणारा हा परिपूर्ण प्लॅन आहे. निश्‍चित परिपक्वता, निश्‍चित उत्पन्न, आयुष्यभरासाठी उत्पन्न आणि दीर्घकालीन उत्पन्न अशा प्रकारचे ते फायदे आहेत. या चार पर्यायांचा तपशील पुढीलप्रमाणे:-1. निश्‍चित परिपक्वता पर्याय – या पर्यायांतर्गत परिपक्वतेवेळी खात्रीशीर फायदा मिळतो. जो एकूण भरलेल्या प्रिमियमच्या 2.45 पट इतका असू शकतो. यामुळे विमाधारकाला भविष्यातील आत्मविश्‍वासपूर्वक आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळत असते.
2. निश्‍चित उत्पन्न पर्याय – या पर्यायाच्या माध्यमातून निश्‍चित कालावधीसाठी (पेआऊट कालावधी) परिपक्वतेनंतर दरवर्षी वार्षिक प्रिमियमच्या 228 टक्केपर्यंत खात्रीशीर नियमित उत्पन्न मिळू शकते. यामुळे निश्‍चित कालावधीसाठी आवर्ती खर्चाची हमी मिळू शकते.
3. दीर्घकालीन उत्पन्न पर्याय – या पर्यायामुळे पेआऊट कालावधीच्या शेवटी एकूण भरलेल्या प्रिमियमच्या बदल्यात 25 ते 30 वर्षांसाठी खात्रीशीर नियमित उत्पन्नाची हमी मिळू शकते. या पर्यायामुळे संबंधीत व्यक्तीला तिच्या कामाच्या वर्षांमध्ये अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची हमी मिळते.
4. आयुष्यभरासाठी उत्पन्नाचा पर्याय – या पर्यायामुळे पेआऊट कालावधीच्या शेवटी एकूण भरलेल्या प्रिमियमच्या बदल्यात वयाच्या 99 व्या वर्षापर्यंत उत्पन्नाची हमी मिळते. यामुळे सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन किंवा वार्षिक वेतनाला अतीरिक्त जोड मिळू शकते.
पॉलिसी टर्मच्या दरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास हमीपूर्ण अतिरिक्त डेथ बेनिफिट्स मिळण्याचा पर्याय उपलब्ध आहे. (लागू होत असल्यास)
एचडीएफसी लाईफ संचय प्लसच्या प्रारंभाबाबत अधिक माहिती देताना एचडीएफसी लाईफचे चिफ अ‍ॅक्चुअरी आणि अपाँइटेड श्रीनिवासन पार्थसारथी यांनी सांगितले की, “एचडीएफसी लाईफ संचय प्लस प्लॅन अशा लोकांच्यासाठी परिपूर्ण आहे ज्यांना पर्यायी उत्पन्नाचा नियमित स्त्रोत आवश्यक आहे. ज्या लोकांना कोणत्याही प्रकारची जोखीम नको असते आणि ज्यांना उतार वयात खात्रीशीर परतावा हवा असतो. त्यांच्यासाठीही हा प्लॅन उपयुक्त आहे. हे प्रोडक्ट अतिशय बारकाव्याने डिझाईन करण्यात आले आहे जे आर्थिक सुरक्षेची हमी देते. ते लग्न, पालकत्व आणि सेवानिवृत्ती अशा आयुष्याच्या सर्वच टप्प्यांमध्ये उपयुक्त ठरते.
आम्ही नेहमीच ग्राहकाभिमुख प्रोडक्ट इनोवेशनवर विश्‍वास ठेऊन काम करत असतो. या प्रोडक्टच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांची आर्थिक उद्दीष्टांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा प्लॅन ग्राहकांना त्यांच्या भविष्यातील चिंतांपासून मुक्तता मिळवून देईल आणि भरपूर आर्थिक परतावा मिळवून देणार आहे.”
अलिकडेच बिजनेस टूडे मनी टुडे फायनान्शियल अवॉर्ड्स 2018-19मध्ये एचडीएफसी लाईफच्या क्लिक 2 प्रोटेक्ट 3D प्लस प्लॅनने बेस्ट टर्म प्लॅन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *