गोकुळची एक दिवसाची उंच्चाकी दुध विक्री १६ लाख ७ हजार लिटर्स – चेअरमन-श्री.रविंद्र आपटे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक (गोकुळ) संघाने दुध उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादक करून त्यांना जास्ती-जास्त लाभ व चांगल्या गुणवत्तेचे दुध देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे.त्यामुळेच गोकुळच्या दररोजच्या दुध संकलनात व विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. यावर्षी गोकुळने ईदच्या दिवशी उंच्चाकी दुध विक्री करून १६ लाख ७ हजार लिटर्स इतकी दुध विक्री एका दिवसात केलेली आहे.अशी माहिती गोकुळचे चेअरमन मा.श्री.रविंद्र आपटे यांनी दिली.
गोकुळ दुधाची विक्री प्रामुख्याने मुंबई,पुणे,कोकण,सांगली,सातारा,बेळगाव व कोल्हापूर इत्यादी ठिकाणी केली जाते.गोकुळच्या या विक्रमाची व प्रगतीची घोडदौड सातत्याने चालू असून याचे सर्व श्रेय दुध उत्पादक शेतकरी,सलग्न दुध संस्था,ग्राहक,वितरक व गोकुळचे कर्मचारी तसेच माझे सहकारी संचालक यांना द्यावे लागेल.अशाच प्रकारचा नवीन दुध विक्रीचा उच्चांक संघ करेल व त्याचा लाभ दुध उत्पादक शेतकऱ्यांना देणेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत असेही चेअरमन श्री.रविंद्र आपटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *