ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

गोकुळचा ५६ वा वर्धापन दिन संपन्‍न …

कोल्‍हापूरः गोकुळ दूध संघाची स्‍थापना १६ मार्च १९६३ इ. रोजी ७०० लिटर दूध संकलनावर झाली आज ७०० लिटर वरुन प्रतिदिनी जवळपास १५ लाख लिटर दूध संकलन होत आहे. यासाठी दूध उत्‍पादक शेतकरी, दूध संस्‍था, व कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे असून त्‍यांच्‍या सहकार्यामुळेच गोकुळ २० लाख लिटरचे उध्दिष्‍ठ साध्‍य करेल असा विश्‍वास संघाचे चेअरमन मा. रविंद्र आपटे यांनी व्‍यक्‍त केला. गोकुळच्‍या ५६ व्‍या वर्धापन दिनानिमीत्‍य गोकुळ दूध संघाच्‍या गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयामध्‍ये ५६ वा वर्धापनदिन कार्यक्रम पार पडला यावेळी संघास सन – २०१७-२०१८ या सालामध्‍ये जास्‍तीत-जास्‍त म्‍हैस दूध पुरवठा करणा-या दूध संस्था, म्‍हैस उत्‍तम प्रत दूध पुरवठा करणा-या संस्‍था, म्‍हैस जास्‍तीत- जास्‍त दूध पुरवठा करणा-या महिला संस्‍थां अशा एकूण ९ दूध संस्‍थांना विशेष
पुरस्‍काराने सन्‍मानित करणेत आले. याचबरोबर म्‍हैस “गोकुळश्री” स्‍पर्धा घेण्‍यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *