गोकुळ दूध संघाच्‍या १४ प्राथमिक दूध संस्‍थांना आय.एस.ओ. ९००१:२०१५ मानांकन : चेअरमन श्री. रविंद्र आपटे

कोल्‍हापूरः ता.०३. कोल्‍हापूर जिल्‍हा दूध संघास दूध पुरवठा करणाया प्राथमिक १४ दूध संस्‍थांना आय.एस.ओ. दर्जाचे कामकाज केल्‍याने ९००१:२०१५ मानांकन मिळाले आहे. अशी माहिती संघाचे अध्‍यक्ष मा.श्री. रविंद्र आपटे यांनी दिली. गेली काही वर्षे या दूध संस्‍था आय.एस.ओ. मानांकन मिळविण्‍याकरीता प्रयत्‍नशिल होत्‍या. त्‍याप्रमाणे त्‍यांनी आपल्‍या कामकाजामध्‍ये विविध सुधारणा करत कार्यक्रमात सहभाग घेतला. त्‍याप्रमाणे या दूध संस्‍थांचे ऑडीट दोन टप्‍यात करण्‍यात आले असून ऑडीट रिपोर्ट टी.यु.व्‍ही कंपनीच्‍या प्रमुख ऑडीटर ज्‍योती नालसे यांनी वाचून दाखवला. ऑडीट रिपोर्टमध्‍ये कोणतीही ञुटी आढळून आली नसलेले
आय.एस.ओ.९००१:२०१५ मानांकन देण्‍यात आले. याकरीता संघाचे कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणेकर, संकलन विभागाचे व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही.तुरं‍बेकर, सहाय्यक व्‍यवस्‍थापक रविंद्र करंबळी,को- ऑर्डीनेटर्स डी.एच.शियेकर व कन्‍सल्‍टंन म्‍हणून रियाज पटवेगार यांनी काम पाहिले. आय.एस.ओ.मानांकना करीता संकलन विभागाने घालून दिलेल्‍या कामकाज पध्‍दतीत दूध संस्‍थांनी बदल करुन दूधाची तपासणी, स्‍वच्‍छता, रेकॉर्ड, दूधाची प्रत, सेवा-सुविधांचा वापर, दूध
उत्‍पादकांशी संवाद इत्‍यादी बाबींमध्‍ये अमुलाग्र बदल केले आहेत. संपूर्ण महाराष्‍ट्रात प्राथामिक दूध संस्‍थांमध्‍ये आय.एस.ओ. मानांकन प्राप्‍त करण्‍याचा बहुमान या संस्थांना मिळाल्‍याने गोकुळच्‍या लौकिकात आणखीनच भर पडल्‍याचे मा.श्री. रविंद्र आपटे यांनी स्‍पष्‍ट केले. मानांकनासाठी दूध संस्‍था,पंचकमिटी, सदस्‍य व कर्मचारी यांनी केलेल्‍या प्रयत्‍नाबद्दल मा.चेअरमन श्री.रविंद्र आपटे यांनी त्‍यांचे आभार मानले. मानांकन मिळालेल्‍या वरील संस्थांना पुढील महिन्‍यामध्‍ये सर्टीफीकेट वितरण करण्‍यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *