गावाला जत्रेच उधाण आलया….

कोल्हापूर प्रतिनिधी ( नम्रता गाडे ) :- उन्हाळ्याची सुट्टी पडली की सर्वांची लगबग सुरू होते ती आपल्या आजोळी जाण्याची त्यातच जर गावामध्ये जत्रा असेल तर मग काही सांगायलाच नको चार दिवस मस्त सुट्टी टाकून जत्रा अनुभवायची इतकाच काय तो डोक्यात विचार सुरू असतो.
अशाच जत्रेच उधाण आलय करवीर तालुक्यातील बालिंगा या गावांमध्ये हजरत पीर मुसा जंग वली यांच्या उरसा निमित्त ही जत्रा तीन दिवसांची असून आजचा पहिला दिवस . गेली तीस ते चाळीस वर्षे या गावाला या जत्रेची परंपरा लाभलेली आहे पण मधल्या काळामध्ये काही कारणास्तव ही प्रथा बंद झाली पण मागील वर्षापासून संपूर्ण गावकऱ्यांनी व ग्रामप्रचायत ने ही प्रथा सुरू ठेवण्याचा मानस घेऊन सुरुवात केली व या जत्रेच हे दुसरे वर्ष.
या जत्रेमध्ये तीन दिवस विविध स्पर्धांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे त्यानुसार आज ४ तारखे रोजी जनरल व सूटा घोडा गाडी शर्यंत घेण्यात आली. तसेच भव्य म्हैस व रेडक्यांच्या शर्यती पार पाडण्यात आल्या. भव्य श्वान स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देखील आहेत
तरी ही जत्रा शांततेत व सुव्यवस्थेत पार पडण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केलें आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *