गावठाण वाढीव जमीन मिळण्यासाठी यळगुड ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

कोल्हापूर/प्रतिनिधी : यळगुड (अंबाबाई नगर) ता.हातकणंगले येथील गेल्या ३५ते४०वर्षापासून गट नं.२८१ मधील राहत असलेल्या शेतमजूरांना गावठाण वाढीव मधील प्लाँट मिळावे या प्रमुख मागणीसाठी यळगुड ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
यळगुड येथील गट नं .२८१ मध्ये गेल्या ३५ ते ४०वर्षापासून राहत असलेल्या शेतमजूर ग्रामस्थ हे ग्रामपंचायत यळगुड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार भुखंडाची मागणी केलेले पात्र लाभार्थी असून या मागणीसाठी त्यांनी अनेकदा मोर्चे आंदोलनाद्वारे केलेली आहेत.तर हातकणंगले तहसिलदार यांच्याकडे ही भूखंडाची मागणी करण्यात आली आहे. परंतु वाढीव गावठाण जमीनीबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय न झाल्याने यळगूड ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलय.
आंदोलनात रामचंद्र चव्हाण, दादासो वाघमारे, प्रविण धुंदरे ,परशुराम घोरपडे, आदिनाथ श्रीखंडे, गणेश रजपूत, संदीप गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *