राधानगरीतून 2828 क्युसेक्स विसर्ग नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा

कोल्हापूर/प्रतिनिधी :
राधानगरी धरण आज सकाळी 11.30 वाजता पूर्ण
क्षमतेने भरले असून धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा उघडला आहे. त्यामधून 1428 व विद्युत विमोचकातून 1400 असा एकूण 2828 क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे. स्वयंचलित दरवाजा क्रमांक तीनही उघडला आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना दक्षतेचा इशारा पंचगंगा पाटबंधारे उपविभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!