करवीर मतदारसंघातून पी.एन. पाटील सडोलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर /प्रतिनिधी

करवीर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या वतीने माजी आमदार पी.एन.पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं.दरम्यान भाजप सरकार हे फसव सरकार असून अशा फसव्या सरकारला घरी बसवण्याची मानसिकता लोकांची झाली असून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलायं.
असंख्य समुदाय व कार्यकर्त्यांचा जल्लोषात करवीर मतदारसंघातील पी.एन.पाटील सडोलीकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अमृत हाँल ला भव्य मेळावा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
या वेळी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील यांनी भाषण करून पी.एन.यांना आमदार करणारच यासाठी त्यांनी कर्यकर्त्याना सूचना ही दिल्या .करवीर मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादी चे कार्यकर्ते तसेच मतदार प्रचंड संख्येने उपस्थित होते.
पी.एन.पाटील यांच्या विजयाच्या घोषनांनी भाग दणाणून गेला.
उमेदवारी अर्ज भरते वेळी कोल्हापूर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील ,गोकूळ चे माजी चेअरमन विश्वास पाटील ,करवीर चे सभापती राजेंद्र सूयवंशी यांच्या सह नेते ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!