बालिंगा ते चंबुखडी कडे जाणा-या मुख्य वितरण नलिकेस गळती पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने सोमवार दिनांक 17 जून 2019 रोजी बालिंगा ते चंबुखडी कडे जाणा-या मुख्य वितरण नलिकेस अचानक गळती उदभवलेली आहे. सदर गळती काढणेचे काम हाती घेणेत येणार असलेने ए वॉर्ड येथील फुलेवाडी, फुलेवाडी रिंगरोड परिसर, लक्षतीर्थ वसाहत परिसर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, आपटेनगर,साने गुरुजी परिसर, तुळजा भवानी कॉलनी परिसर, तलवार चौक परिसर, हरिओम नगर, जुना वाशी नाका परिसर, शिवाजीपेठ परिसर, सरनाईक कॉलनी, राज कपूर पुतळा परिसर, जाऊळाचा गणपती परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, बिंदुचौक परिसर, महालक्ष्मी मंदीर परिसर, जुना बुधवार तालिम परिसर, संपुर्ण सी व डी वॉर्ड व त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग परिसरातील नागरीकांना सोमवार दि.17 जून 2019 रोजी होणारा पाणी पुरवठा काम पुर्ण होईपर्यंत होवू शकणार नाही. तसेच मंगळवार दिनांक 18 जून 2019 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल याची कृपया नोंद घ्यावी. तरी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरुन कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे हि विनंती.
वरील भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्याचे दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरव्दारे पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. तरी सर्व संबंधीत भागातील नागरिकांनी सहाकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!