मजले येथील महाश्रमदानास उदंड प्रतिसाद

तुफान आलया… म्हणत बालकांपासून ते वृध्दापर्यंत सर्वचजन सकाळी सहा वाजल्यापासून खोरे पाट्या घेऊन कामास सुरुवात केली. 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मजले ता. हातकणंगले येथील जलमित्र फौडेशन यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाश्रमदानास उदंड प्रतिसाद लाभला. इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर परिसरातील विविध सामाजिक संस्था, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
जलमित्र फौडेशन, मजले यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाश्रमदान शिबिरास मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला. यावेळी हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार सुजित मिणचेकर, तहसिदार सुधाकर भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्रमदानामध्ये इचलकरंजी येथील शिवम फौडेशन, तारदाळ, गिरिमित्र संघटना, इचलकरंजी, इचलकरंजी परिसर मुद्रक संघ, रोटरी क्लब शिरोळ,हिंदवी स्पोर्टस, जयसिंगपूर, वीर सेवा दल जिल्हा व तालुका समिती, इचलकरंजी नागरिक संघ, रिंगण फिटनेस क्लब, जलमित्र फौंडेशन, निमशिरगाव, इतर समाजसेवक व्यक्ती
कोल्हापूर जिल्हा तसा पाणीदार जिल्हा पण जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील मजले गावाचा पाणी प्रश्न म्हणजे गंभीरच. फेब्रुवारी महिना आला की गावातील सर्व विहिरी, बोअर अटतात, शेतीसाठी पाण्याची कमतरता भासू लागते. बालकांपासून ते वृध्दापर्यंत सर्वांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. या सर्वातून कायमची मुक्तता होण्यासाठी गावातील काही तरुणांनी एकत्र येवून गत वर्षी जलमित्र फौडेशनची स्थापना केली. तेव्हापासून सातत्याने गाव पाणीदार करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतून, नाम फौडेशन तसेच कही सामाजिक संस्थांकडून, पर्यवरणप्रेमीकडून मिळेल ती मदत घेवून आज पर्यंत प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून सात हेक्टर जमिनीवर 7777 वृक्षलागवड करण्यासाठी 12 लाख, लक्ष्मी पठारावर 4800 मीटर डीप सीसीटी, 6 वनतलाव, 6 मातीबांध व 1 गॅबीअन बंधारा यासाठी 34 लाख इतका निधी मंजूर करुन दिला आहे. ते सर्व काम पुर्णही झाले आहे. तसेच नाम फौडेशनच्या सहकार्याने तलाव क्रमांक 3 काम, ओढा खोली करण व रुंदीकरण व माती बांध याचे काम पुर्ण करण्यात आले आहे. मजले येथील पर्यावरण प्रेमी श्री. शांतीनाथ पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे जेसीबी इंडिया प्रा. लि पुणे यांच्याकडून उपाध्ये पाळीतील 5 एकरामध्ये डीप सीसीटीची खुदाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!