पूर ओसरलेल्या भागात तेराव्या दिवशी 320 टन कचरा व गाळ गोळा

कोल्हापूर :- महापालिकेच्यावतीने आज तेराव्या दिवशीही पुर ओसरलेल्या भागात स्वच्छता मोहिम सुरु असून आज शाहूपूरी, विल्सन पुल, सुतारवाडा, व्हिनस कॉर्नर, सीता कॉलनी, पंचगंगा रोड, रिलायन्स मॉल या ठिकाणच्या संपुर्ण परिसराची स्वच्छता करुन 320 टन कचरा, प्लॅस्टिक व गाळ उठाव करण्यात आला. सदरचा गाळ व कचरा 162 टिप्पर, 45 डंपर व 22 आर.सी.गाडया एकूण 229 खेपा करुन 320 टन कचरा व गाळ गोळा करण्यात आला.
यावेळी न्यू कॉलेजचे 25 विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी 4 जेसीबी, 13 डंपर, व महापालिकेच्या 225 सफाई कर्मचा-यांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
यामध्ये महापालिकेचे 2 जे.सी.बी व 13 डंपर, जेसिपी इंडिया आसोसिएट्स 2 जेसीबीचा समावेश आहे. स्वच्छतेसाठी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
सदरची स्वच्छता मोहिमे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरिक्षक श्रीमती शुभांगी पोवार, अरविंद कांबळे, नंदु पाटील, श्रीराज होळकर, करण लाटवडे, शिवाजी शिंदे, मुकादम व सफाई कर्मचा-यांनी राबविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!