पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर  

कोल्हापूर /प्रतिनिधी
गेले सात दिवस महापुराच्या विळख्यात अडकलेल्या आणि अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्याची सुटका होऊ लागली आहे. कोल्हापूर सह सांगली, शिरोळ आदी भागात पावसाने हाहाकार उडवून दिला. पुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये घुसले. या लोकांना सतर्क करून मदतकार्य आणि बचावकार्य करण्याचे काम शिवसेना व युवासेनेच्या टीमने केले आहे. शहरात ओढावलेल्या या महाप्रलयाने शुक्रवार पेठ, हरिओम नगर, नंदनवन पार्क, रमणमळा, मुक्तसैनिक वसाहत, जाधववाडी, बापटकॅम्प, कदमवाडी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आदी परिसरातील नागरिकांवर संकट ओढावलेले आहे. सदर ठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, दीपक गौड, अमर समर्थ, किशोर घाटगे, सनी अतिग्रे, शैलेश कुंभार आदी शिवसैनिकांनी पुराच्या पाण्यात उतरून उपलब्ध तराफे आणि ट्रकांच्या इनरमधून सुमारे ४५० पूरग्रस्त कुटुंबांचे स्थलांतर केले.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रशासनाशी समन्वय राखत बचाव कार्यास गती दिली. त्याचबरोबर या प्रलयाची माहिती शिवसेनेच्या मंत्री महोदयांना देत आवश्यक बचाव यंत्रणा तातडीने उपलब्ध करण्याची मागणी केली. दरम्यान आमदार राजेश क्षीरसागरही एन.डी.आर.एफ. ची बोट व जवानांसह शहरात दाखल झाले. त्यामुळे बचाव कार्याला अधिक गती मिळाली. त्यांनी वेळोवेळी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री नाम. एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मुंबई, ठाणे, आदी ठिकाणाहून आवश्यक यंत्रणा व मदत मागविली.
शिवसेनेच्या वतीने गेले सात दिवस शहरातील पूरग्रस्त भागांमध्ये जेवण आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यासह आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष पूरस्थितीची पाहणी करीत स्थलांतरीत नागरिकांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करून त्यांना दिलासा दिला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून शिवसेनेने १००० लिटर दुध, दहा हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, साड्या, चुडीदार, लहान मुलांचे कपडे, चादर, ब्लँकेट आदींचे वाटप केले आहे. यासह शहरात अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी ३ रुग्णवाहिका शिवसेनेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  
          या पूरपरिस्थितीत मदत पोहचविण्याकरीता शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने आरोग्य मंत्री नाम.एकनाथजी शिंदे व परिवहन मंत्री नाम. दिवाकरजी रावते हे स्वत: गेले चार दिवस कोल्हापूर येथे ठाण मांडून आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्यासमवेत शहर आणि परिसरासह आंबेवाडी, चिखली, शिरोळ, आदी भागांचा दौरा करून पूरग्रस्तांच्या सुरक्षिततेसाठी व मदतीसाठी आवश्यक यंत्रणा उभी केली. यासह स्वत: पूरग्रस्त भागात जावून नागरिकांना जेवण, पाणी, जनावरांना चारा देवून त्यांना धीर देण्याचे काम केले आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी हरिपूजा पूरम, खानविलकर पंप या भागातील पूरग्रस्तांच्या स्थलांतरासाठी १२ ते १५ फुट पाण्यातून जात मदतकार्य केले.     
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातुन बाहेर पडण्यासाठी हजारो मदतीचे हात सरसावले असुन, शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरेसाहेब व शिवसेना नेते युवासेना अध्यक्ष मा.आदित्यजी ठाकरेसाहेब यांच्या आदेशाने शिवसेनेकडुन भरघोस मदतीचा ओघ सुरु झाली आहे. शहरात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने शिवसेना पुरग्रस्त सहाय्यता केंद्र,दसरा चौक येथील सी.के.पी. बोर्डिंग येथे सुरु करण्यात आले आहे.या केंद्रातुन शहरातील पुरग्रस्त भागात मदत पोहोच केली जाणार आहे.यामध्ये जीवनावश्यक वस्तु,अन्नधान्य,कपडे,चादर आदि स्वरुपात हि मदत केली जाणार आहे.
यासह ज्या – ज्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसून अन्नधान्याची नासाडी झालेली आहे. त्यांना शिवसेना अन्नधान्य पुरवठा करणार आहे. शासकीय दफ्तरी नोंद झालेल्या पूरग्रस्त कुटुंबाला रु. पाच हजारांची मदत करण्यात येणार आहे. पुरामध्ये बाधित झालेल्या प्रत्येक रुग्णांची वैद्यकीय जबाबदारी आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन उचलणार आहे. यासह पूर ओसरल्यानंतर याभागामध्ये वैद्यकीय शिबिरे, स्वच्छता अभियान शिवसेना राबविणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
          या शिवसेनेच्या टीममध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, कोल्हापूर शहर शिवसेनेचे दिपक गौड, अमर समर्थ, राजु पाटील,सुजित देशपांडे, तुकाराम साळोखे, प्रकाश सरनाईक, किशोर घाटगे, सनी अतिग्रे, अंकुश निपाणीकर, शैलेश कुंभार, विक्रम पवार, निवास राऊत, ओंकार परमणे, रविंद्र सोहनी, रणजित सासने, अरूण पाटील, पियुष चव्हाण, कपिल सरनाईक, योगेश चौगुले, उदय पोतदार, मुकुंद मोकाशी,अमोल बुढ्ढे, आदि शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!