पूरग्रस्त नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या ठाणे डॉक्टर्स असोसिएशनच्या पथकाचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : सर्वच बाबतीत सुजलाम सुफलाम असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यावर यावर्षी नैसर्गिक आपत्ती कोसळली, या जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्त भागात शिवसेनेने सर्वतोपरी मदत कार्य केले आहे. पूरपरिस्थिती गंभीर बनल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याची खबरदारी घेणे गरजेचे असताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आरोग्यमंत्री नाम. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे आरोग्य यंत्रणा आणि औषध पुरवठा करण्याची मागणी केली. पूरपरिस्थिती पूर्वपदावर येई पर्यंत शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या वतीने शिवसहाय्य योजनेतून आरोग्य मंत्री नाम.श्री. एकनाथ शिंदे स्वत: कोल्हापुरात तळ ठोकून होते. आमदार राजेश क्षीरसागर यांची मागणी त्यांनी तातडीने मान्य करून ठाणे डॉक्टर्स असोसिएशनचे १०० डॉक्टरांचे पथक त्यांनी कोल्हापूरला आणले.
एकीकडे पूरपरिस्थिती निवळत असतना नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
या काळात गावोगावी जावून पूरग्रस्त नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे अनिवार्य होते. अशा वेळीच ठाणे डॉक्टर्स असोसिएशनच्या या पथकाने अविरत सेवा बजावत पूरग्रस्त नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण केले. गेले १५ दिवसात या पथकाने पूरग्रस्त भागातील सुमारे ३५ हजार लोकांची तपासणी केली असून, सुमारे ४० ठिकाणी आरोग्य शिबिरे घेत नागरिकांना मोफत सेवा पुरविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी हे पथक देवदूताप्रमाणे धावून आले असून, आरोग्य मंत्री नाम.एकनाथ शिंदे,  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे जिल्हा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जे.डी. भोर यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने अविरत सेवा बजावली आहे. याकरिता आरोग्य मंत्री नाम. श्री. एकनाथ शिंदे यांनी सुमारे अडीच कोटी रुपयांची उच्च प्रतीची औषधे स्वखर्चाने उपलब्ध करून दिली.
कोल्हापूर जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटाच्या काळात देवदूताप्रमाणे धावून येणाऱ्या आणि गेली १५ दिवस अविरत रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचा आज शिवसेनेच्या वतीने सत्कार करून त्यांना साभार निरोप देण्यात आला.
या डॉक्टरांच्या पथकाने आई अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेच्या वतीने भगवा फेटा, शाल व गुलाबाचे फुल देवून पथकातील डॉक्टरांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. त्याच बरोबर शिवसैनिकांबरोबर सातत्याने मदतकार्यात सहभागी होऊन आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देणारे आरोग्य मंत्री नाम. श्री. एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचेची शिवसेनेच्यावतीने आभार मानण्यात आले.
 यावेळी ठाणे जिल्हा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जे.डी. भोर, मंगेश चीवटे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, किशोर घाटगे, जयवंत हारुगले, धनाजी दळवी, अमित चव्हाण, राजू पाटील, अजित गायकवाड, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, रघुनाथ टिपुगडे, मंदार तपकिरे, गजानन भुर्के, विक्रम पोवार, सुशील भांदिगरे, पियुष चव्हाण, कपिल सरनाईक आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!