फ्लिपकार्ट आणि ऍक्सिस बँक यांचे नवीन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड पॉवर्ड बाय मास्टरकार्ड

मुंबई : ई-कॉमर्समधील आघाडीची बाजारपेठ फ्लिपकार्ट व ऍक्सिस बँकेने भागीदारी करून नवीन एक्सक्लुसिव्ह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड पॉवर्ड बाय मास्टरकार्ड आणले आहे. ग्राहकांसाठी सर्वोत्तम लाभ व ऑनलाईन, ऑफलाईन अशा सर्व खर्चांवर अमर्यादित कॅशबॅक ही या क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये आहेत. क्रेडिट सुविधेची व्याप्ती अधिक वाढविण्याच्या व वेगाने विकसित होत असलेल्या क्रेडिट कार्ड इकोसिस्टिमचा भारतात अधिकाधिक प्रसार व्हावा या उद्देशाने फ्लिपकार्ट, ऍक्सिस बँक व मास्टरकार्ड यांनी ही भागीदारी केली आहे.

भारतात क्रेडिट कार्ड इकोसिस्टिमचा वेगाने विकास होत असून जास्तीत जास्त व्याप्ती व स्वीकार या दोन्ही बाबतीत वाढीची अनुकूलता खूप जास्त आहे. बहुतांश भारतीयांना कोणत्या न कोणत्या स्वरूपात अनौपचारिक क्रेडिट उपलब्ध होत असले तरी अनुमानित आकडेवारीनुसार फक्त ४९ मिलियन क्रेडिट कार्ड्स ग्राहकांना दिली गेली आहेत. सिबिलच्या अनुमानांनुसार क्रेडिटसाठी पात्र भारतीयांची संख्या २२० मिलियन्स आहे. याचा अर्थ, औपचारिक आर्थिक संस्था त्यांच्यापैकी एक तृतीयांश लोकांपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. त्याचबरोबरीने यापैकी फक्त ७२ मिलियन लोक ‘क्रेडिट सक्रिय’ आहेत ज्यांचे बँकेत किंवा वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थेमध्ये लाईव्ह खाते आहे.

फ्लिपकार्ट समूहाचे सीईओ श्री. कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितले, “आमच्या प्रत्येक प्रयत्नांचा केंद्रबिंदू ग्राहक असतो. आम्ही आमच्या सर्व हितधारकांसाठी मूल्य निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. ऍक्सिस बँक व मास्टरकार्डसोबत भागीदारीतून तयार करण्यात आलेल्या या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डमधून आम्ही भारतात औपचारिक क्रेडिट सुविधेची व्याप्ती वाढवण्याची आमची वचनबद्धता पूर्ण करत आहोत. ही अशी सुविधा आहे ज्यामुळे ग्राहकांना सर्वाधिक लाभ मिळतील. क्रेडिट सुविधेची व्याप्ती वाढवल्याने भारतात अर्थपूर्ण विकासाला चालना मिळेल. कोट्यवधी भारतीयांना फारसे आर्थिक दडपण न घेता आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मदत करत आमची भूमिका बजावत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”

ऍक्सिस बँकेचे एमडी व सीईओ श्री. अमिताभ चौधरी यांनी सांगितले, “ऍक्सिस बँक आपल्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या पेमेंट्स सुविधा देते. नाविन्यपूर्ण भागीदारी मॉडेल्सच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्न करत असतो. आकर्षक ऑफर्स देण्याच्या बरोबरीनेच ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यावरही आम्ही भर देत असतो. भारतातील नव्या पिढीला प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम हवी असते, सेवा, सेवेचा दर्जा, निवड, सुविधा हे सर्वकाही सर्वात चांगले असावे याबद्दल ते चोखंदळ असतात. आम्ही याच ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन आमच्या सेवा योजना आखत असतो. फ्लिपकार्ट व मास्टरकार्डसोबत भागीदारी करून क्रेडिट सुविधेची व्याप्ती वाढवताना व भौगोलिक विकास करत अधिक जास्त ग्राहकांपर्यंत आमच्या सेवा पोहोचवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!