महास्वच्छता मोहिमेत सलग अठरावा रविवार

कोल्हापूर :- कोल्हापूर शहरामध्ये सकाळी 7.00 वाजल्यापासून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदरच्या मोहिमेचा अठरावा रविवार असून या अभियानामध्ये विवेकानंदकॉलेज एनएसएसचे 30 विद्यार्थी, विद्यार्थीनी, केएमसी कॉलेजचे 25 विद्यार्थी विद्यार्थीनी व स्वरा फौंडेशनचे 20 कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला. यावेळी 45 डंपर कचरा, गाळ व प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. या मोहिमेकरीता आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आरोग्यधिकारी डॉ.दिलीप पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाई, दिवाकर कारंडे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, हर्षजीत घाटगे, पशुवैदयकिय अधिकरी डॉ.विजय पाटील यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले.
सकाळी लक्ष्मीपूरी, कामगार चाळ, मोकाशी पॅचेस, रिलायन्स मॉल मागे, फोर्ड कॉर्नर, व्हिल्सन पूल, दसरा चौक, संप आणि पंप, पंचगंगा घाट नदी परिसर, कुंभार गल्ली, सुख सागर हॉटेल, शाहूपूरी, सुतार वाडा, गाडी अड्डा, जयंती नाला सिध्दीविनायक मदीर परिसर, कोरे हॉस्पीटल, संभाजी पुल परिसर, रंकाळा तलाव या ठिकाणी ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी संप आणि पंप येथे विवेकांनद कॉलेज एनएसएसचे विद्यार्थी विद्यार्थींनी यांच्या समवेत आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी वृक्षारोपण केले.
आज सकाळी 9 वाजलेपासून केशवराव भोसले नाटयगृह येथे पुणे येथील आरोग्य सेवा व सकाळ रिलिफ फंड विद्यमाने महापालिकेच्या आरोग्य, अग्निशमन विभागाच्या पूरामध्ये काम केलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराचा शुभारंभ आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुण्याचे डॉ.योगेश गाडेकर व त्यांची टिम यांनी या शिबीरात सहभाग घेतला.
यावेळी आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, पर्यावरणचे उदय गायकवाड, दिलीप देसाई, गिता हासुरकर, आरोग्य निरिक्षक श्रीमती शुभांगी पोवार, अरविंद कांबळे, सुशांत कांबळे, नंदु पाटील, श्रीराज होळकर, करण लाटवडे, शिवाजी शिंदे, मनोज लोट, मुनिर फरास मुकादम व आरोग्य विभागाकडील 250 कर्मचारी व नागरीक यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!