फार्मटेक इंडिया ऍग्री इक्विपमेंट कंपनीने तयार केलेले ऊस तोडणी यंत्र शेतीसाठी उपयुक्त

कोल्हापुर /प्रतिनिधी : ऊस शेती करत असताना ऊस तोडणीचा प्रश्न प्रत्येक वर्षी सतत मोठ्या प्रमाणात शेतकरी व कारखानदार यांना भेडसावत असतो. कामगारांची कमी होत असलेली उपलब्धता आणि ठेकेदारांकडून ऍडव्हान्स पोटी घेतलेल्या रकमेची फसवणूक त्यामुळे ऊस तोडणी करताना मशीनची अत्यंत गरज भासत आहे .
सध्या उपलब्ध असलेल्या मोठ्या मशीनची आवाक्याबाहेरची किंमत शेतात तोडणी करतेवेळी येत असलेल्या अनेक अडचणी व त्रुटी पाहता फार्मटेक इंडिया ऍग्री इक्विपमेंट या कंपनीने अत्याधुनिक सुबक लहान आणि कमी किमतीचे ऊस तोडणी यंत्र तयार केले आहे हे यंत्र थायलंड येथून आणण्यात आले असून
या यंत्राचे उद्घाटन करण्यात आले आज येथील केदार पाटील व कुमार दळवी यांच्या शेतात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक या यंत्राद्वारे करून दाखविण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी यांची उपस्थिती होती.
येथील फार्मटेक इंडिया अँग्री इक्विपमेंट्स चे संचालक श्री चैतन्य गुलाबराव सरनोबत यांनी हे यंत्र कोल्हापूरमधील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे आज या मशिनचे उदघाटन करतेवेळी दालमिया शुगर फॅक्टरी चे कृषी अधिकारी श्रीधर गोसावी ,ईआयडी पँरी ग्रुपचे एजीएम श्री रमेश तमिळनाडू, राजाराम साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन शिवाजी पाटील ,पन्हाळा पंचायत समिती सभापती अनिल तंदूर कर ,पृथ्वीराज सरनोबत, माजी डीवायएसपी विजयसिंह गायकवाड ,माजी महापौर रामभाऊ फाळके ,थायलंड येथून आलेले ग्लोबल बिझनेस हेडचे मिस्टर तनत ,मॅन्युफॅक्चरिंगचे हेड नूतावात ,मेकॅनिकल हेड इन्चार्ज मिस्टर पीन,महाराष्ट्र ट्रॅक्टर मेकॅनिक असोसिएशनचे प्रेसिडेंट श्री.प्रकाश जाधव यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच चैतन्य सरनोबत यांनीं या मशीन विषयीची महिती दिली यामध्ये त्यांनी हे यंत्र एका तासात एक एकर ऊसाची तोडणी करते या यंत्राचा वापर रस्त्यापासून आत असलेल्या शेतात करता येतो .असे सांगितले लहानात लहान सरी पासून मोठ्या सरीतील ऊस तोडणी सहज शक्य होते जमिनीजवळ तळापासून अखंड ऊस कापल्यामुळे हिरवा चारा वैरण जनावरांसाठी मिळते यंत्राचे वजन कमी असल्याने जमिनीवर दबाव पडत नाही आणि पुढील वर्षीचे पीक चांगले येते याचबरोबर उसाचा पाला काढणी यंत्र व ऊसाचे एकत्रीकरण करण्याचे यंत्र व लिफ्टिंग मशीन हेही यंत्र आमच्याकडून शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. हे यंत्र अत्यंत सुबकतेने शेतीमध्ये वापरता येणार आहे यामध्ये शेतीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही उत्पादनही चांगले होणार असल्याचे सांगितले
अशा उपकरणांचा वापर करून भविष्यात शेती आणि ऊसाची तोडणी मधील सुलभता वाढवणे सोपे होणार आहे असे मत व्यक्त केले.जे कोणी हे मशीन खरेदी करतील त्यांना आम्ही सिजनमध्ये कामे उपलब्ध करून देणार आहोत अशीही चैतन्य सरनोबत यांनी ग्वाही दिली आहे.
यावेळी ग्लोबल बिझनेस हेडचे मिस्टर तनत यांनी बोलताना भारतामध्ये ऊसतोडणी करताना बऱ्याचदा अनेक अडचणी येतात हे लक्षात घेऊनच फार्मटेक इंडिया अँग्री इक्विपमेंट कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशात या मशीनचे वितरण करण्यासाठी या कंपनीची वितरक म्हणून निवड केली आहे हे असे सांगितले भारतामध्ये ऊस शेती करताना अनेक अडचणी आहेत हे लक्षात घेऊन हे मशीन तयार करण्यात आले आहे आता या कंपनीच्या माध्यमातून हे मशीन सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतीसाठी हे मशीन अंत्यत उपयुक्त असल्याचे सांगितले.
प्रत्यक्ष केदार पाटील व कुमार दळवी यांच्या शेतात या मधीनद्वारे प्रात्यक्षिक सादर करतेवेळी असंख्य शेतकरी अनेक साखर कारखान्याचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. गुरुकृपा हॉल पाटील पेट्रोल पंप च्या मागे शिवछत्रपती शिवाजी महाराज फुल आंबेवाडी येथे या मशीन चे उद्घाटन करण्यात आले व १ किलोमीटर अंतरावर यंत्राचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.यावेळी आलेल्या काही शेतकरी यांनी मशीन चांगले व कमी किमतीचे व शेतीसाठी उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *