शेतकऱ्यांनी कारखान्याकडून साखर स्वीकारु नये:जय शिवराय किसान मोर्चा संघटनेचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना ऊसबीलाऐवजी साखर घ्यायला सांगून एफआरपीच्या कायद्यातून पळवाट काढायचा प्रयत्न चालविला आहे तो आम्ही खपवून घेणार नाही. व शेतकऱ्यांनीही कायद्याने मिळणाऱ्या रकमेवरील आपला हक्क सोडू नये व कारखानदारांच्या साखर देऊन
पळवाट काढण्याच्या प्रवृत्ती विरोधात चुकीचा पायंडा पाडण्याचा धोरणाबाबत विरोध करावा. तसेच कोणीही साखर स्विकारू नये असे आवाहन जय शिवराय किसान मोर्चाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले.
प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे वास्तविक गेली अनेक वर्षे चळवळीत काम केलेल्या संघटनेनेच मुळात चुकीची मागणीकरून कारखानदाना अप्रत्यक्ष बळ देण्याचे काम सुरू असल्याची शंका आहे.यापूर्वीही मागील दोन हंगामात ८०.२० चा एफआरपी. चा फॉम्यूला स्विकारून कारखानदारांना रान मोकळेकरून दिले आहे.व परत आता साखर स्विकारण्याचे आवाहन करून शेतकऱ्यांची दिशाभूल करायचे थांबवावे. कोणताही शेतकरी घरामध्ये नगदी पीके ठेऊ शकत नाही. कारण शेतकऱ्यांना आपली उपजीवीका करणेसाठी जवळ पैसे नसतात. ती केव्हा बाजारात नेऊन विकतो अशी परिस्थिती असते. असे असताना आता परत साखर घेऊन ती शेतकरी विकणार कोठे ? कारण आजपर्यंतचा बाजारातील अनुभव पाहता व्यापारी शेतकऱ्यांकडून हमीभावाने साखर घेणार नाहीत व शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने साखर विकायची वेळ येईल.हे या शेतकरी नेत्यांना कळल नाही काय ?शुगर कन अंबट १९६६ नुसार आम्हाला आमचा ठरल्याप्रमाणे दर मिळावा व एफआरपी ‘च्या बदल्यात साखर घेण्यास जय शिवराय किसान मोर्चाचा विरोध आहे.तसेच शेतकऱ्यांनीही साखर कारखानदारांकडून साखर स्विकारू नये. तसेच कारखाना प्रशासनाने सध्या नवीन फॉर्म भरुन एफ आर.पी च्या रक्कमेऐवजी साखर घेण्याच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये.प्रसिद्धी पत्रकार अध्यक्ष शिवाजी माने,शामराव पाटील, शिवाजी शिंदे, राजेश पाटील, धनाजी पाटील, उत्तम पाटील, सदाशिव कुलकर्णी, प्रताप चव्हाण यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *