कळंबा कारागृहातील बंदीजनांना गणेश मूर्ती बनवण्याच भागीरथी महिला संस्थकडून प्रशिक्षण, बंदीजनही बनवू लागले श्री गणेशाच्या आकर्षक आणि सुबक मूर्ती

विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनासाठी काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत भागीरथी महिला संस्थेने कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडून श्रीगणेशाची मूर्ती बनवून घेण्याचा उपक्रम राबवला. या मूर्तींना आकर्षक रंगांमध्ये रंगवून मूर्तींवर अंतिम हात फिरवण्यात आला. या मूर्ती आता विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत.
गणेशमूर्तीचे आगमन म्हणजे चैतन्य आणि उत्साहाचा सोहळा ! गणरायाच्या वास्तव्यामुळे घराघरातील वातावरण मांगल्याने भरून जाते. लाडक्या गणरायाला घरी येण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर सण समारंभाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासणार्या आणि समाजातील उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित घटकांसाठी काम करणार्या भागीरथी महिला संस्थेच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. कळंबा कारागृहातील महिला कैद्यामार्फत गणेश मूर्ती बनवून घेण्यात आल्या. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम पुर्णत्वाला गेला. महिला बंदीजनांना प्रशिक्षिका सिमा जाधव यांनी शाडूच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर कारागृहातील महिलांनी एकाहून एक आकर्षक आणि देखण्या गणेश मूर्ती बनवल्या. सफाईदार कारागीराप्रमाणे या महिलांनी श्रींच्या मूर्तींना आकार दिला. दुसर्या टप्प्यात या गणेश मूर्तींना आकर्षक रंगांनी रंगवण्यात आलं. विविध साधनांनी मूर्तींना सजवण्यात आलं. या मूर्र्तींवर अंतिम हात फेरत मूर्ती तयार करण्यात आल्या. आता या तयार झालेल्या गणेश मूर्ती विक्रीसाठी कारागृहाबाहेर ठेवण्यात येणार आहेत. या उपक्रमाला तुरूंग अधिक्षक शरद शेळके, महिला तुरूंग अधिकारी मिरा बाबर, हरिशचंद्र जाधवर, चंद्रकांत आवळे, भागीरथीच्या वर्षा जोशी यांनी पुढाकार घेवून सहकार्य केले. एकूणच महिला बंदीजनांमार्फत शाडूच्या एकाहून एक सुंदर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवून घेऊन भागीरथी महिला संस्थेने सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय लिहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!