एक्साइड लाइफ इन्शुरन्स आपल्या ग्राहक जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहे भारतीयांना आर्थिक सज्जतेसाठी मदत

कोल्हापूर, १७, नोव्हेंबर, २०१८: एक्साइड लाइफ इन्शुरन्सने आज कोल्हापूरकरांसाठी विशेष तयार केलेल्या ग्राहक जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी आर्थिक सज्जतेच्या मूलभूत मुद्दयांबाबत त्यांना शिक्षण देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला २०१५ मध्ये सुरुवात केल्यापासून, एक्साइड लाइफ इन्शुरन्स देशभरातील श्रेणी दोन व श्रेणी तीन शहरांतील लोकांना यात सहभागी करून घेत आहे आणि या माध्यमातून त्यांना विम्याचे महत्त्व समजून घेण्यात मदत करत आहे तसेच भविष्यकाळासाठी योग्य आर्थिक निर्णय करण्यास आवश्यक अशी माहिती त्यांना पुरवून त्यांना सज्ज करत आहे.

या विशेष डिझाइन करण्यात आलेल्या ग्राहक जागृती कार्यक्रमामध्ये दृक-श्राव्य साधनांचा वापर करून एक संवादात्मक सत्र घेतले जाते त्याचप्रमाणे पेपर-पेन्सिल उपक्रमही घेतले जातात. मानवी आयुष्याचे मूल्य ही संकल्पना समजून घेण्यास सहभागींना मदत केली जाते. त्यातून त्यांना त्यांच्या भविष्यकाळातील आर्थिक गरजा समजून घेण्यात मदत होते आणि पर्यायाने व्यवस्थित सुरक्षेचे महत्त्वही पटते. या उपक्रमाच्या माध्यमातून, भारतीयांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वंयपूर्ण करण्याच्या अधिक मोठ्या लक्ष्याच्या पूर्तीसाठी योगदान देण्याचे एक्साइडचे उद्दिष्ट आहे.

एक्साइड लाइफ इन्शुरन्सचे संचालक- मार्केटिंग आणि डायरेक्ट चॅनल- मोहित गोयल या उपक्रमाबद्दल म्हणाले, “आर्थिकदृष्ट्या संरक्षित राहणे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचे आहे यावर आमचा, एक्साइड लाइफ इन्शुरन्सचा, विश्वास आहे. ‘लवकर सुरुवात’, ‘एकत्रिकरणाची शक्ती’ आणि‘योग्य जीवन विमा’ या संकल्पना प्रत्येक भारतीयाला समजल्या पाहिजेत. भारतातील आर्थिक साक्षरतेचे कमी प्रमाण बघता, विशेषत: श्रेणी दोन व श्रेणी तीनमधील शहरांमधील आर्थिक साक्षरतेचे प्रमाण बघता, लोकांना दीर्घ व आनंदी आयुष्यासाठी आर्थिक नियोजनात मदत करणारा हा उपक्रम सुरू ठेवण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *