ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

माजी सैनिक : हयातीच्या दाखल्यांसाठी 31 मार्च पर्यंत मुदत वाढ – मेजर सुभाष सासने

कोल्हापूर: जिल्ह्यातील माजी सैनिक/विधवा यांना आर्थिक वर्ष 2018-19 ची मदत मिळणे करीता स्वत: हयात असलेचे दाखले ऑनलाईन पाठविण्यासाठी 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी दिली.
जिल्ह्यातील माजी सैनिक/विधवा यांना कळविण्यात येते की, KSB यांचेकडून चरीतार्थ मदतीचे ऑनलाईन प्रकरण मंजुर आहे व यापुर्वी चरीतार्थ मदत मिळत आहे अशा non pensioner माजी सैनिक/विधवा यांनी आर्थिक वर्ष 2018-19 ची मदत मिळणे करीता स्वत: हयात असलेचे दाखले जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह KSB च्या वेबसाईटवर ऑनलाईन पाठविण्यास दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ देणेत आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *