ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

देशातील माजी आमदार , माजी खासदारांसाठी, माजी आमदार फंड,माजी खासदार फंड…. सुरू कर :-सादिक खाटीक

आटपाडी:- देशातील माजी आमदार , माजी खासदार यांची सेवानिवृती नंतरही अनुभवी कार्याची शिदोरी देश कार्यासाठी अविरत कार्यरत रहावी यासाठी केंद्र सरकार , राज्य सरकारांनी माजी आमदार फंड , माजी खासदार फंड सुरू करावा अशी लक्षवेधी, न्याय मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी केली आहे . आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावचे सुपुत्र , जत विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार अॅडव्होकेट श्री.जयंत सोहनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सादिक खाटीक यांनी ही मागणी शासनाकडे केली आहे . शेगाव – गुळवंची हा सोहनी साहेबांच्या मळ्याजवळून जाणारा कोरडा नदी पर्यतचा रस्ता , शेकडो शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याने आणि या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने सदरचा सहा किलोमीटरचा रस्ता तातडीने केला जावा म्हणून मी काही महिन्यापूर्वी मोठा आवाज उठविला होता . राज्यातल्या विविध वृत्तपत्रातील लक्षवेधी बातम्या , वॉटस अप , फेसबुक द्वारे राज्याचे लक्ष वेधले होते . राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष , आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रयत्नही केले होते .आमदार जयंतराव पाटील साहेब यांनी याची तातडीने दखल घेत ग्रामीण विकास मंत्री ना .पंकजाताई मुंढे यांना हा रस्ता करणे संबधी नागपूर अधिवेशनवेळी पत्रही दिले होते. तथापि या रस्त्याला अदयाप न्याय मिळालेला नाही हे दुर्देव. या विदारक वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि सोहनी साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी आज केंद्र सरकारकडे , देशातल्या सर्वच राज्य सरकारकडे , केंद्रशाषीत राज्य सरकारकडे एक न्याय आणि अत्यावश्यक मागणी वृतपत्रे , वॉटस अप , फेसबुक इत्यादी प्रसारमाध्यमांच्या द्वारे नोंदवू इच्छितो . लोकसभा निवडणूकीच्या नंतर या मागणीकडे संसद आणि सर्वच विधीमंडळांच्या सदस्यांनी लक्ष देवून ही मागणी सत्यात उतरवावी . तसा कायदा संमत करावा . देशातल्या कोणत्याही राज्याच्या विधीमंडळात विधानसभेवर किंवा विधान परिषदेवर काम केलेल्या माजी आमदाराला तसेच संसदेच्या लोकसभेत किंवा राज्यसभेत काम केलेल्या माजी खासदाराला, त्यांच्या कार्यक्षेत्रात विधायक कामांवर खर्च करण्यासाठी खासदार फंड , आमदार फंडा च्या धर्तीवर ..माजी खासदार फंड , माजी आमदार फंड ,सुरु करावा .विदयमान आमदार ,खासदार यांना जेवढा फंड त्यांच्या आमदार – खासदार फंडासाठी पाच वर्षात उपलब्ध करून दिला जातो . त्याच्या निम्म्याने पण वेगळ्या निधीचा हा नवीन माजी आमदार फंड , माजी खासदार फंड शासनाने अस्तित्वात आणावा . ज्या सामाजीक प्रतिष्ठेने अशा मान्यवरांनी संसदेत अथवा विधीमंडळात काम केलेले असते , ती प्रतिष्ठा त्यांच्या सेवा निवृतीनंतरही जपली जाणे महत्वाचे आहे . समाज मान्यता पावलेल्या या सर्व माजी आमदार , माजी खासदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सामाजीक कार्यावर , विधायक उपक्रमांवर खर्च करता येणार असल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला ,भागाला न्याय देता येणार आहे . शिवाय हे अनुभवी, अभ्यासू , जाणकार लोक पुन्हा देशसेवेत उतरल्याने देशाला या हजारो प्रामाणीक देशभक्तांची मोठी सेवा मिळणार आहे . हे मान्यवर सतत कार्यरत, सजग राहील्याने विकास गतीने धावणारच आहे पण भ्रष्टाचारालाही मोठा पायबंध बसू शकणार आहे. त्यामुळे अशा माजी आमदार , माजी खासदार महोदयांना अधिक सन्मानाने , अधिकाराने वागता येणार आहे सामाजीक सेवेत , राष्ट्र उभारणीत ,सहभाग वाढणार असल्याने देशाच्या, राज्यांच्या योजनांना प्रचंड गती, उर्जा मिळणार आहे.त्या दृष्टीने देशातल्या सर्वच हयात माजी आमदार , माजी खासदार यांच्यासाठी ,नवीन माजी आमदार फंड , माजी खासदार फंड सुरू करून राज्यांच्या सरकारने , त्यांच्या विधीमंडळ सदस्यांनी आणि नव्याने केंद्रात सत्तेवर येणाऱ्या सरकारने , लोकसभा सदस्यांनी , राज्यसभा सदस्यांनी हा ऐतिहासिक निर्णय करून नव क्रांती घडवावी. देशातल्या अशा अंदाजे तीस ते चाळीस हजार अनुभवी माजी आमदार माजी खासदार महोदयांच्या माध्यमातून प्रत्येक पंचवार्षीक मध्ये साधारणतः दोन लाख कोटी रुपये विधायक , योग्य कामांवर खर्ची पडणार असल्याने महत्वाचे देश कार्य साधले जाणार आहे. देशातील हजारो आजी , माजी आमदार , खासदार महोदयांनी या मागणीचे जोरदार समर्थन करावे असे आवाहनही सादिक खाटीक यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *