माजी मंत्री डाॅ.विनयरावजी कोरे (सावकर) आज भूमिका स्पष्ट करणार

वारणानगर: कोल्हापूर हातकणंगले लोकसभा निवडणुकीची माघार ८ एप्रिलला झाली त्यानंतर पक्षाच्या व कार्यकर्त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मेळावा घेऊन पाठिंब्याबाबतचा निर्णय घेऊ असे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री.डाॅ.विनयरावजी कोरे यांनी सांगितले होते कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मतधिक्याचे जाळे भक्कम आहे हे हुकमी व निर्णायक मताधिक्य मिळवण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे मात्र सावकरांनी आपली भूमिका सस्पेन्स ठेवून उमेदवारांच्या ह्रदयाचे ठोके वाढले असले तरी यावर स्थानिक पातळीवर राजकीय हिताचा निर्णय घेणार आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा पाठिंबा मिळवणेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटिल,प्रा.संजय मंडलिक,कृषीमंत्री सदाभाऊ खोत,तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,धनंजय महाडीक,हसन मुश्रीफ यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत डाॅ.कोरे (सावकर) यांनी पश्चिम पन्हाळा त्याला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकत्यांच्या बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये प्रा.संजय मंडलिक आणि विद्यमान खासदार धनंजय महाडीक या दोघांपैकी कोणाला पाठींबा देणार यांच्याकडे सर्व जिल्हाचे लक्ष लागले आहे आज सायंकाळी ५.०० वाजता वारणानगर येथील वारणा दूध येथे कोल्हापूर लोकसभा निवडणुकी संदर्भात निर्णय स्पष्ट होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *