माजी नगरसेवकांच्या पेन्शनचा निर्णय मनपा प्रशासनाने घेवू नये: सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूरात महानगरपालिका प्रशासनाकडे माजी नगरसेवकांनी आपणास पेन्शन मिळावी अशी मागणी केली असून ही मागणी अयोग्य असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड महापालिकेवर बसणार आहे.त्यामुळे महापालिका प्रशासनाने माजी नगरसेवकांच्या पेन्शनचा निर्णय घेवू नये.अशी प्रमुख मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश उर्फ ओंकार लाड यांच्याशिष्टमंडळाकडून निवेदणाद्वारे करण्यात आली.सदर मागणीचे निवेदन आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कोल्हापूरात महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी आपणास पेन्शन मिळावी अशी मागणी केली आहे .तशी चर्चा कोल्हापूर शहरामध्ये व महापालिकेमध्ये सुरू आहे. मुळात ही मागणीच हास्यास्पद वाटते.कारण नगरसेवक हे महापालिकेचे कामगार म्हणून काम पहात नसतात तर ते आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असतात .सध्याची कोल्हापूरची आर्थिक स्थिती पहाता कोल्हापूरचे शहराचे अनेक मूलभूत प्रश्न निधी अभावी प्रलंबीत आहेत.पैशा अभावी अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. सध्या महापालिकेमध्ये नवीन कामगार भरती नाही.तर अनेक महापालिकेच्या जागा रिक्त आहेत.कोल्हापूर शहरातील रस्ताची दुर्दशा फार वाईट आहे. विकासाचे काम काय महापालिकेचे सध्याचे उत्पन्न फार कमी आहे. महापालिके वर कोट्यावधीचा बोजा आहे .या सर्व गोष्टीसाठी निधीच उपलब्ध नसलेने माजी नगरसेवकांसाठी निधीची तरतूद आपण कशी करणार फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकप्रतिनिधी हे आर्थिक हलाखीत असावेत पण याला ठोस आधार नाही.सामान्य जनतेच्या करातून हा पैसा जाणार आहे .त्यामुळे कोल्हापूर महापालिकेवर मोठा आर्थिक ताण येणार आहे. नियमाप्रमाणे कोणत्याच महापालिकेमध्ये माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची तरतूद नाही आहे.तरी या संदर्भात महापालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन माजी नगरसेवकांच्या पेन्शनचा निर्णय घेवू नये.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश लाड ,राहूल नाईक, शुभम शिरहट्टी, निवास भोसले ,केदार पवार ,शुभम वाशीकर,निशांत माने ,सिद्धार्थ कांबळे ,पुष्कर सुर्यवंशी,नागराज कंबार यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!