मनोरंजनपूर्ण मालिका ‘भाखरवडी’तर्फे मालिकेचे यश साजरे करण्‍यासाठी ‘श्री सत्‍यनारायण पूजेचे’ आयोजन

मुंबई / प्रतिनिधी :
सोनी सब आपल्‍या प्रेक्षकांना कौटुंबिक मनोरंजन देण्‍याशी कटिबद्ध आहे. चॅनेलने हास्‍याशी निगडित अनोखे विषय सादर करत आपली छाप पाडली आहे. तसेच चॅनेल नवनवीन विषय सादर करण्‍यासाठी देशभरात अत्‍यंत लोकप्रिय आहे. सोनी सबचा भरपूर आनंद देणा-या कथानकांवर विश्‍वास आहे आणि वास्‍तविक जीवनाशी निगडित असलेली मालिका ‘भाखरवडी’मध्‍ये हेच दिसून येते. मालिकेला तिच्‍या संबंधित व वास्‍तववादी पटकथेसाठी प्रेक्षकांकडून भरपूर कौतुक मिळाले आहे. मालिकेचे यश साजरे करण्‍यासाठी सोनी सबने ”श्री सत्‍यनारायण पूजेचे’ आयोजन केले. मालिकेला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम व पाठिंबा मिळाला. हे यश साजरे करण्‍यासाठी या पूजेचे आयोजन करण्‍यात आले. मीडियासोबत चर्चा करत आणि स्‍वादिष्‍ट मराठी पक्‍वान्‍नांचा आस्‍वाद घेत या साजरीकरणाचा शेवट झाला.
मालिका भारतीय घराघरांमध्‍ये दिसण्‍यात येणा-या विविध भावना, मूल्‍ये आणि पात्रांना सादर करते. सोनी सबवरील मालिका ‘भाखरवडी’चे भारतभरात प्रेक्षक आहेत. अहमदाबाद आणि कथेचे मूळ शहर असलेल्‍या पुण्‍याला रोड ट्रिप्‍सच्‍या भेटीवर असताना मालिकेला त्‍यांचे चाहते व प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. जीवनाचे सार दाखवणा-या या मालिकेची निर्मिती केली आहे जेडी मजेठिया व आतिष कपाडिया यांनी आणि या मालिकेमध्‍ये देवेन भोजानी व परेश गनात्रा सारखे प्रतिभावान कलाकार आहेत. या दोघांनीही दीर्घकाळानंतर एकत्र टेलिव्हिजनवर पुनरागमन केले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्‍ये सुरू झाल्‍यापासून मालिका प्रेक्षकांना आवडणा-या पात्रांच्‍या उत्‍कृष्‍ट अभिनयासह प्रेक्षकांना प्रभावित करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरली आहे.
मिळालेल्‍या यशाने अत्‍यंत आनंदित झालेले आणि मालिकेमध्‍ये अण्‍णाची भूमिका साकारणारे देवेन भोजानी म्‍हणाले, ”मला वाटते प्रेक्षक पात्रांमधील वास्‍तविकता व त्‍यांच्‍यामधील सांस्‍कृतिक विविधतेची प्रशंसा करतात आणि ते सुरेखरित्‍या सादर करण्‍यात आले आहे. विनोदी पद्धतीने महत्‍त्‍वपूर्ण कौटुंबिक मूल्‍यांना सादर करणारी ही मालिका हलकीफुलकी व भावनाप्रवण आहे. आमच्‍या यशाला साजरे करण्‍यासाठी आणि हे यश गाठण्‍यामध्‍ये साह्य केलेल्‍यांचे आभार मानण्‍यासाठी ‘श्री सत्‍यनारायण पूजेचे’ आयोजन करण्‍यात आले.”
महेंद्रची भूमिका साकारणारा परेश गनात्रा म्‍हणाला, ”आम्‍ही जेथे जाऊ, तेथे प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम पाहून खूपच आनंद होत आहे. यामुळे आम्‍हाला मालिकेला अधिकाधिक यशाच्‍या दिशेने घेऊन जाण्‍यासाठी अधिक मेहनत घेण्‍याची प्रेरणा मिळते. या आनंदमय यशाचे साजरीकरण आणि आमच्‍या प्रेक्षकांच्‍या प्रतिसादासह आम्‍हाला सत्‍यनारायण पूजेचे आयोजन करताना खूप आनंद झाला. आमची मालिका भविष्‍यात अधिकाधिक यश गाठेल, अशी आम्‍ही देवाकडे प्रार्थना केली.”
गोखले आणि ठक्‍कर कुटुंबांवर आपले प्रेम व पाठिंबाचा वर्षाव करत रहा आणि पहा ‘भाखरवडी’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता, फक्‍त सोनी सबवर