डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलतर्फे पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी

कोल्हापुरातील महापुरामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. आता आरोग्याच्या समस्याही नागरिकांना भेडसावत आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात थैमान घातलेल्या महापुरामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय. महापुरामुळ नागरिकांचे घर, शेती , जनावरं यांचं मोठे नुकसान झालंय. आता पूर ओसरेल तसं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पूरग्रस्त नागरिकांचे आरोग्य चांगलं राहावं यासाठी, आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलच्या वतीनं पूरग्रस्त भागात मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आली आहेत. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी असा आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.

आज दिवसभरात गांधीनगर, वसगडे, वळीवडे, उचगाव, फुलेवाडी, मार्केटयार्ड, दुधाळी, रायगड कॉलनी याठिकाणी आरोग्य शिबीरे घेण्यात आलं. याठिकाणी संजय डी पाटील, युवा नेते ऋतुराज पाटील आणि सौ प्रतिमा सतेज पाटील यांनी भेटी देऊन नागरिकांच्या आरोग्याची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!