ह्युमन राईट मिरर
Monday, 22 Apr 2019

“डोंबिवली रिटर्न” जे जातं…तेच परत येतं? २२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात

लोकलचे खडखडणारे रूळ… मुंबई महानगरातली प्रचंड गर्दी… त्याबरोबरीनं येणारे प्रश्न… आणि मनातला कोलाहल… “डोंबिवली रिटर्न” जे जातं…तेच परत येतं? या चित्रपटाच्या ट्रेलर मधून हे सगळं वेगवान आणि लक्षवेधी पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. स्वाभाविकच या चित्रपटाची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे.
कंरबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेंद्र तेरेदेसाई यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासह हृषिकेश जोशी, अमोल पराशर, त्रिश्निका शिंदे, सिया पाटील आदींच्या भूमिका आहेत. उदयसिंग मोहिते यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून योगेश गोगटे यांचे संकलन आहे.राष्ट्रीय पारितोषिक विजेता शैलेंद्र बर्वे यांचे संगीत व पार्श्वसंगीत लाभले असून ध्वनी रेखांकन राष्ट्रीय पारितोषिक विजेते अनमोल भावे यांचे आहे.Money is a root cause of all evil. ‘पैसा सगळ्या दु:खाचं मुळ आहे.’ ही म्हण आपल्या मध्यमवर्गात किती खोलवर रूजलेली आहे ह्याचं चित्रं उभं करणारी हा चित्रपट आहे. ही कथा मला सुचली मुलुंड – सीएसटीच्या एका प्रवासात… संदीप कुलकर्णीला ती आवडली. आपला पहिला चित्रपट कसा असावा ह्या बाबतीत मी आग्रही होतो. निर्माता म्हणून संदीपने तो आग्रह पूर्ण केला. तो नट म्हणून जितका प्रगल्भ आहे, तितकाच निर्माता म्हणूनही आहे. खरंतर तो माझा काॅलेजपासूनचा दोस्त. आम्ही एकत्र नाटकातून कामं केली होती. निर्माता म्हणून त्याच्या पहिल्या चित्रपटाचे (प्रेमसूत्र) मी संवादही लिहिले होते. सुरुवातीला हा चित्रपट करताना मला जराही ताण नव्हता. पण जेव्हा तो बाय-लिंग्वल (हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांत) करायचा ठरला तेव्हा थोडं दडपण आलं. कारण ह्या चित्रपटाचा कॅनव्हास खूप मोठा आहे. नावामुळे हा ‘डोंबिवली फास्ट’चा सिक्वेल आहे असं वाटेलही… पण ह्या पेक्षा समर्पक दुसरं नाव सुचलंच नाही. उद्या झालीच त्याच्याशी तुलना तरीही बरंच आहे. एका चांगल्या चित्रपटाशी तुलना होणं केव्हाही चांगलंच,’ असं लेखक दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितलं.
संदीप कुलकर्णी साकारत असलेल्या अनंत वेलणकर या व्यक्तिरेखेभोवती हा चित्रपट फिरतो. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱया अनंत वेलणकरच्या आयुष्यात असं काय घडतं की त्याचं आयुष्य बदलून जातं याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. मुंबईच्या लोकलमध्ये धक्के खात प्रवास करणाऱया प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटेल असा हा चित्रपट असल्याचं स्पष्ट जाणवतं.
२२ फेब्रुवारीला डोंबिवली रिटर्न” जे जातं…तेच परत येतं? प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *