ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

जिल्ह्यात तलाठी भरती परीक्षा आता ऑनलाईन वस्तूनिष्ठ स्वरूपात -जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात तलाठी संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरीता प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहीरातीमध्ये परीक्षेचे स्वरूप हे आता ऑनलाईन लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तूनिष्ठ स्वरूपाच्या असतील,असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्हा उपविभागीय महसूल अस्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तलाठी भरतीची जाहीरात 28 फेब्रुवारी 2019 रोजी वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. या जाहीरातीमधील परीक्षेचे स्वरूप मुद्दा क्र. 1 मध्ये लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील असे म्हटले होते, तथापि या ऐवजी -‘ऑनलाईन लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतील’ असा बदल करण्यात आला असून या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *