जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीत 14 प्रकरणांमध्ये अर्थसहाय्य मंजूर

कोल्हापूर/प्रतिनिधी :
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989) ट्रॉसिटी अंतर्गत व नागरी हक्क संरक्षण अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांचा विहित वेळेत तपास पूर्ण करुन तपासावरील प्रकरणांचे दोषारोप वेळेत न्यायालयात दाखल करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले. यावेळी 23 प्रकरणांमध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश मोने, जिल्हा सरकारी वकील ड. विवेक शुक्ल, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यासह विविध शासकीय, अशासकीय सदस्य उपस्थित होते.
ट्रॉसिटी अंतर्गत व नागरी हक्क संरक्षण कायदा अंतर्गत दाखल प्रकरणांच्या निर्गतीसाठी यंत्रणांनी व्यक्तीश: पाठपुरावा करावा, असे सांगून याबैठकीत विविध प्ररकणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी एकूण 14 प्रकरणांमध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले असून यातील एफआयआर प्राप्त झाल्यानुसार 9 प्रकरणांमध्ये तर दोषारोप प्राप्त झाल्यानुसार 14 प्रकरणांमध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *