आपत्‍ती मदतकार्याला हातभार लावण्‍यासाठी रॅपिड रिस्‍पॉन्‍सला वेईकलची सुविधा

मुंबई/प्रतिनिधी :
आपत्‍तीजनक स्थितींमध्‍ये वेळेवर सहाय्यता देण्‍यासह समाजावर सकारात्‍मक परिणाम पाडण्‍याच्‍या हेतूने जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व मदतकार्यामध्‍ये विशेषीकृत असलेली एनजीओ रॅपिड रिस्‍पॉन्‍ससह सहयोग जोडला आहे. जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने यंदाच्‍या मान्‍सूनमध्‍ये रॅपिड रिस्‍पॉन्‍सला खासरित्‍या तयार करण्‍यात आलेली लँड रोव्‍हर डिस्‍कव्‍हरी स्‍पोर्ट उपलब्‍ध केली आहे. भारतभरात नैसर्गिक आपत्‍तीमध्‍ये असहाय्य समुदायांना अन्‍न व मदत किटचे वाटप करण्‍यासाठी, मदतकार्य आणि वैद्यकीय सहाय्यता देण्‍यासाठी या सुविधेचा आपात्‍कालीन प्रतिसादक म्‍हणून उपयोग करण्‍यात येईल.
जग्‍वार लँड रोव्‍हर इंडिया लि. (जेएलआरआयएल)चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्‍हणाले: ”डिस्‍कव्‍हरी स्‍पोर्ट सारख्‍या लँड रोव्‍हर वेईकल्‍स खडतर प्रदेशांमधील सर्वोत्‍तम ड्रायव्हिंग क्षमता असण्‍यासाठी आणि महापूरामुळे निर्माण झालेल्‍या स्थितींसह इतर आपत्‍तीजनक स्थितींचा सामना करण्‍याच्‍या क्षमता असण्‍यासाठी ओळखल्‍या जातात. भारतात जग्‍वार लँड रोव्‍हरच्‍या १० वर्षे पूर्ण होण्‍याच्‍या प्रसंगी आम्‍हाला रॅपिड रिस्‍पॉन्‍समधील टीमला भारतातील अशा नैसर्गिक आपत्‍तीजनक स्थितींमध्‍ये असहाय्य लोकांना मदत करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये हातभार लावण्‍याचा अभिमान वाटत आहे.”
रॅपिड रिस्‍पॉन्‍सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मोहम्‍मद फारूख म्‍हणाले, ”भारत हा जगातील सर्वात आपत्‍तीप्रवण देशांपैकी एक देश आहे. रॅपिड रिस्‍पॉन्‍समधील आम्‍ही नैसर्गिक आपत्‍तींना बळी पडलेल्‍या लोकांना त्‍वरित, प्रभावी व स्थिर पाठिंबा देण्‍याचा प्रयत्‍न करतो. लँड रोव्‍हरची क्षमता व तंत्रज्ञानासह सुसज्‍ज होत आम्‍हाला आपत्‍तीजनक स्थितींमध्‍ये अधिक जलदपणे व प्रभावी सहाय्यता देण्‍याचा विश्‍वास आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!