दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडियाचा प्रकाशराव आवाडे यांना जीवन गौरव पुरस्कार

दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साखर उद्योगामध्ये तांत्रिक सल्ला आणि मार्गदर्शन करणाèया अग्रगण्य संस्थेकडून या वर्षीचा जीवन गौरव हा पुरस्कार जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी वस्त्रोद्योग मंत्री श्री.प्रकाशराव आवाडे यांना सुप्रसिध्द उद्योगपती श्री.रणजित पुरी यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कलकत्ता येथे संस्थेच्या ७७ व्या वार्षिक महाअधिवेशन कार्यक्रमावेळी आयोजित एका खास समारंभात हा पुरस्कार श्री.प्रकाश आवाडे यांना देण्यात आला. यावेळी कारखान्याचे संस्थापक माजी खासदार श्री.कल्लाप्पाण्णा आवाडे, सौ.किशोरी आवाडे, शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनचे अध्यक्ष श्री.संजय अवस्थी, कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.बाबासो चौगुले, इतर संचालक, कार्यकारी संचालक श्री.मनोहर जोशी, अधिकारी तसेच विविध राज्यातील साखर कारखान्यांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सत्कारमूर्ती प्रकाश आवाडे यांनी शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनच्या सर्व पदाधिकाèयांचे आभार व्यक्त केले. सन १९२५ मध्ये स्थापन झालेल्या असोसिएशनने साखर निर्मिती प्रक्रियेमध्ये नवनवीन तांत्रिक प्रयोग आणि संशोधनाचा उपयोग देश आणि विदेशातील साखर उद्योगाला होण्यासाठी महत्वाचे योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. कमी खर्चात अधिक कार्यक्षमतेचा वापर करणे ही काळाची गरज आहे. नवीन संशोधनामुळे केवळ साखर कारखान्यांनाच नव्हे तर शेतकèयांनाही त्याचा लाभ मिळू शकतो. या पाश्र्वभूमीवर शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनकडून साखर उद्योगाला यापुढेही भरीव योगदान मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.
देशातील ग्रामीण विकासाचे केंद्रqबदू असणाèया सहकार क्षेत्रामध्ये सहकारी साखर कारखान्यांचे योगदान खूप मोठे आहे. माझे वडील आवाडेदादा यांच्या दूरदृष्टीतून खाजगी क्षेत्रातील ऊसाअभावी बंद पडलेला साखर कारखान्यातून सहकारीकरणाद्वारे जवाहरची निर्मिती झाली. सुरुवातीला दैनंदिन २५०० टन ऊस गाळप क्षमतेसह १.५ मेगॅवॅट वीज निर्मिती करणारा कारखाना आज दैनंदिन १२००० टन ऊस गाळप आणि २७ मेगॅवॅट वीज निर्मितीपैकी १५ मेगॅवॅट वीज विद्युत मंडळास निर्यात करीत आहे. आवाडेदादांच्या नेतृत्वाखालील जवाहर कारखान्याची नेत्रदीपक घोडदौड म्हणजे सभासदांचा व्यवस्थापनावरील दृढ विश्वास आणि अधिकारी-कर्मचाèयांची मेहनत तसेच संचालकांचे अत्यंत मोलाचे सहकार्य मिळाले आहे. मागील हंगामात जवाहरने १७ लाख ६३ हजार टन ऊस गाळप करून १२.७५ टक्के साखर उताèयाने २२ लाख ४७ हजार क्विंटल साखर निर्मिती करून महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस गाळप व साखर निर्मिती करणारा कारखाना ठरल्याचे सांगून फॉqलग फिल्म इव्हॅपोरेटरसारख्या उपकरणांचा अवलंब केल्याने ३१.४० टक्के स्टीमचा वापर करून ११.४० टक्के बगॅसची बचत केल्याचे नमूद केले.

( कार्यकारी संचालक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *