सायकलस्वार हरिबास्करन यांचे ११ फेब्रवारीला कोल्हापूरात होणार आगमन:सौ.स्वरुपा कोरगावकर

कोल्हापूर/प्रतिनिधी : शारीरिक क्षमतेनुसार कोणतेही काम ,ध्येय नेटाने आणि सातत्याने पूर्ण करून निरोगी, सदृढ आरोग्यमय जीवन जगण्यासाठी२६ जानेवारी रोजी केरळमधून सायकल सफर सुरू केलेल्या सायकलस्वार हरिबास्करन यांचे कोल्हापूरात मातोश्री वृद्धाश्रमात ११ फेब्रुवारी रोजी ११.३० आगमन होणार असून जेष्ठ नागरिक, वृध्दांशी संवाद अनुग्रहन कार्यक्रम सायंकाळी ५ वा.रेल्वे फाटक शेजारील स्नेहधामध्ये होणार आहे. अशी माहिती ऋणानुबंध चँरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.स्वरुपा कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सायकलस्वार हरिबास्करन यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये संचालक व उपाध्यक्ष पदावर काम केले आहे. तर शिक्षण आयआयटी व आयआयएम अशा राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थामध्ये झाले आहे. यापूर्वी त्यांनी कँन्सर रुग्णांच्या मदतीसाठी भरवलेल्या सायकलींग चळवळीत राजस्थानात २५०.कि.मी.ची दौड मारून सहभाग पूर्ण केला आहे. जेष्ठांनी कोणताही संकल्प केला तर तो पूर्ण होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे सायकलस्वार हरिबास्करन. त्यामुळे शारीरिक क्षमतेनुसार कोणतेही काम ,ध्येय नेटाने आणि सातत्याने पूर्ण करून निरोगी, सदृढ आरोग्यमय जीवन जगण्यासाठी त्यांनी २६ जानेवारी रोजी केरळमधून सायकल सफर सुरू केली.त्यांची ही सफर केरळ,तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यामधून अखेर दिल्ली येथे पोचून या सफरची सांगता होणार आहे. तर कोल्हापूरात ११ फेब्रवारीला सकाळी ११.३० वा.त्यांचे आगमन होणार आहे. दरम्यान सायंकाळी ५ वा. रेल्वे फाटक शेजारी असलेल्या स्नेहधाम मध्ये जेष्ठ नागरिकांसाठी संवाद अनुग्रहन कार्यक्रम होणार आहे.तर १२ फेब्रवारीला पहाटे ६वा.सायकलने कराडला प्रयाण करणार असून या कार्यक्रमाचा लाभ जेष्ठ नागरिक, सायकलस्वार यांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पत्रकार परिषदेला रविंद्र ढाले,गिरीजा गोडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *