ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

कर्तुत्ववान महिलांची गगनभरारी समाजाला दिशा देणारी : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोषाध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी – दिं.८मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कर्तुत्ववान अशा सर्वच स्त्रियांच्या कार्याचा या दिवशी गौरव होत असतो. आजच्या घडीला महिला पुरुषांच्या एक पाउऊल पुढे जावून कामगिरी करताना आपणांस पहावयास मिळते. महिलांना कोणत्याच क्षेत्रात कमी लेखू नये. महिला दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळतात.अशा आशयाचा एक अनोखा संदेश देण्याकरिता महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे चालणारे दैनंदिन काम शिवसेना महिला आघाडी आणि भगिनी मंचच्या वतीने करण्यात आले. आज स्त्रियांच्या पारंपारिक जीवनाला आधुनिकतेचा स्पर्श झाला असून, त्यामुळे स्त्रिया स्वकर्तृत्वावर आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन समाजाला सक्षम करण्याचे काम करीत आहेत. कर्तुत्ववान महिलांची हीच गगनभरारी समाजाला नवी दिशा देणारी ठरत आहे.असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केले.
सर्वसामान्यांच्या कोणत्याही कामासाठी सदैव खुले असलेले शिवसेनेचे शनिवार पेठ येथील कार्यालय नेहमीच गजबजलेले असते. याठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करतात. पण आज हीच समाजकार्याची भूमिका उचलली शिवसेनेच्या रणरागिणीनी .पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेना शहर कार्यालयाच्या कामाची सूत्रे शिवसेनेच्या महिला आघाडीने हाती घेतली.
यावेळी येणाऱ्या प्रत्तेक नागरिकाला समक्ष भेटून त्यांच्या समस्यांचे निराकरण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांनी केले .त्यांना साथ मिळाली शिवसेनेच्या महिला आघाडीची.. स्त्रिया कोणत्याही कामात मागे हटणार नाहीत, हाच संदेश या अभिनव उपक्रमातून शिवसेना महिला आघाडीने दिला.
यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांनी, आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्तेक क्षेत्रात काम करीत आहे. भारतात आज नामवंत, लेखिका, कलाकार, शास्त्रज्ञ, राजकारण, खेळाडू, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर्स म्हणून महिलांनी नांवलौकीक मिळविला आहे. पूर्वी स्त्री ही बंधनात अडकलेली होती, परंतु आजच्या घडीला स्त्रियांनी घेतलेली गगनभरारी स्त्री जीवनाला स्वात्रंत्र्य देणारी आहे, म्हणूनच स्त्री जन्माचा आम्हाला अभिमान आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आजच्या शहर कार्यालयाच्या दैनंदिन कामाकाजासोबत आलेल्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण महिला आघाडीने केले. यासह आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गोरगरीब रुग्णांना मंजूर झालेल्या आर्थिक निधी पत्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष सौ वैशाली क्षीरसागर(वहिनी) यांनी रुग्णांच्या कुटूंबियाकडे सुपुर्द केला. यामध्ये शिवाजी पेठ येथील रहिवासी श्रीकांत सरनाईक यांना रु ४० हजार रुपये,आझाद गल्ली येथील सौ प्रतिमा रेडीज यांना रु २५हजार रुपये, पापाची तिकटी येथील गौस पटवेगार यांना रु २० हजार रुपये,लाईन बाजार बावडा येथील मुस्तफा शेख यांना ५० हजार रुपये,शाहूपुरी ५ वी गल्ली येथील सतीश चव्हाण यांना ३५हजार रुपये इतकी मदत त्यांच्या उपचारासाठी देण्यात आली.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख सौ मंगलताई साळोखे, महिला संघटक सौ पूजा भोर,सौ पूजा कामते, सौ गीता भंडारी, सौ शाईन काझी, सौ गौरी माळदकर, सौ मंगलाताई कुलकर्णी, सौ सुनीता भोपळे, सौ मीना पोतदार, सौ पूजा पाटील, रुपाली कवाळे आदी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *