क्रॉसड्रेन कामासाठी रस्ता वाहतुकीस बंद

कोल्हापूर:- बी वॉर्ड प्रभाग क्रमांक.45 कोळेकर तिकटी येथे वडगावकर घर ते लेटेस्ट तरुण मंडळ रोड येथे पाणी निर्गतीसाठी क्रॉसड्रेन बांधणेचे काम महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात येणार असून सदरचा रस्ता वाहतुकीसाठी शुक्रवार दिनांक 12 जुलै 2019 ते 26 जुलै 2019 या कालावधीत बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत अवजड वाहनांसह सर्व वाहनांस सदरचा रस्ता वाहतुकीस बंद करावा लागणार आहे. तरी या कालावधीत वहातुकीसाठी मिरजकर तिकटी, प्रायव्हेट हायस्कूल, लाड चौक, नंगिवली चौक या पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *