देश का महा त्योहार – भव्य मानवी रांगोळी साकारणार- आयुक्त डॉ.कलशेट्टी

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिका मार्फत 5000 विद्यार्थ्यांच्या सहभागाने ʇदेश का महा त्योहारʈ या आशयाची भव्य मानवी रांगोळी म.गांधी मैदान, कोल्हापूर येथे दि. 09/04/2019 रोजी सकाळी 07.30 वाजता साकारणेत येणार आहे. त्यामध्ये शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने लोकशाही बळकटी करणासाठी 100 टक्के मतदान करण्याबाबत मतदारांमध्ये जनजागृती होणेच्यादृष्टीने सदरचा उपक्रम को.म.न.पा. मार्फत राबविणेत येणार आहे. यावेळी मी मतदान करणार याबाबत मतदारांचे स्वाक्षरी अभियान राबविणेत येणार आहे.
सदर उपक्रमाचे नियोजनासाठी सहभागी शाळा मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांची बैठक कोल्हापूर हायस्कूल येथे मा. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे उपस्थितीत पार पडली. यावेळी उपायुक्त मंगेश शिंदे, नायब तहसिलदार प्रकाश दगडे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, विस्तार अधिकारी ओतारी, प्रशासनाधिकारी शंकर यादव, सहा. नोडल अधिकारी डी.एस. तळप, मुख्याध्यापक हिरेमठ, जगदिश ठोंबरे उपस्थित होते.
मानवी रांगोळी साकारणेसाठी सहा. नोडल अधिकारी डी.एस. तळप, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, नागेश हंकारे, राजेंद्र बनसोडे, विʉाास माळी, रितेश माने, रमजान मुल्ला, प्रशांत जाधव, संजय वाडकर, शैलेश कांबळे, शांताराम सुतार इ. परिश्रम घेणार आहेत.
त्यामध्ये प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, एम.एल.जी. हायस्कूल, प्रि. इंदूमती देवी हायस्कूल, मनपा पी.बी. साळुंखे विद्या., एस.एम.लोहीया हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, विमला गोयंका इं.मि. स्क्ूल, इंदिरा गांधी हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल, नूतन आदर्श विद्यालय, मनपा नेहरुनगर विद्यामंदिर, मनपा वीर कक्कय विद्या., कोल्हापूर इंग्लिश स्कूल, विकास विद्यामंदिर, मनपा राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत.
रांगोळीसाठी उपस्थित विद्यार्थ्यांना खाउ वाटप, पिण्याचे पाणी सोय, ऍ़म्ब्युलन्स सुविधा इ. सोयी महापालिकेमार्फत पुरविणेत येणार आहेत.
आयुक्त यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाळांना सक्रीय सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रसारमाध्यमांना या देश का महा त्यौहार आशयाच्या मानवी रांगोळीचे प्रसिद्धीसाठी आवाहन केले. मान्यवरांनी या मानवी रांगोळीचे ठिकाणी शहरवासियांनी उपस्थित राहून लाभ घेण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या कार्यक्रमाचे ड्रोनद्वारे चित्रिकरण होणार आहे. मतदार जागृतीसाठी पथनाटय, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रॅली, पोवाडा, मानवी साखळी इ. सारखे विविध उपक्रम कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांचेमार्फत आयोजित करुन मतदान टक्का वाढविणेसाठी जनजागृती करणेत येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *