कॉमर्स कॉलेजच्या माजी विदयार्थ्यांची रॅली ने मेळाव्याची जनजागृती

कोल्हापूर/प्रतिनिधी : कॉमर्स कॉलेजतर्फे माजी विद्यार्थी संघाने मेळाव्यानिमित्त मोटर सायकल रॅली काढली नऊ ते दहा फेब्रुवारीला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात होणार आहे यासाठी लोकांमध्ये मेळाव्याची जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली .
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते रॅलीचे उदघाटन झाले. ६०० माजी विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते .कॉमर्स कॉलेज पासून रॅलीला सुरुवात झाली विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रचंड उत्साह होता कॉमर्स कॉलेज, बिंदू चौक, शिवाजी पुतळा चौक, सीपीआर चौक, दसरा चौक,लक्ष्मीपुरी,उमा टॉकीज ते परत कॉमर्स कॉलेज अशी ही रॅली काढण्यात आली .रॅलीत विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या जनजागृती केली सर्वांनी उपस्थित राहावे व माजी विद्यार्थी मेळाव्याला नोंदणी करावी असे आवाहनही केले .
मेळाव्याकरिता २००० माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून सात फेब्रुवारीला कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तूची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे १९५७ ते २०१८ पर्यंत सर्व माजी विद्यार्थी रॅलीत उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर संस्थेचे उपाध्यक्ष प्रसाद कामत सदस्य ऍड. व्ही. एन .पाटील अप्पर जिल्हाधिकारी किशोर तावडे ,माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष सुनील नागावकर, सचिव प्रमोद जगताप ,स्मिता घोसाळकर, प्रवीण गुहागरकर ,दिलीप शेवाळे ,विजयराज खोबरे ,रोहित साळुंखे, अंकिता जगताप ,अनिल फातले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *