ह्युमन राईट मिरर
Friday, 24 May 2019

काँलेज जीवनावर भाष्य करणारा युथफुल चित्रपट ‘आम्ही बेफिकीर ‘२९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला

कोल्हापूर/प्रतिनिधी : हरिहर फिल्मचे नागेश मिश्रा,अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे ,रोहित चव्हाण निर्मित,रोहित पाटील सहनिर्मित तर कविश्वर मराठे दिग्दर्शित काँलेज जीवनावर भाष्य करणारा तर सर्वांना आपलासा वाटणारा युथफुल चित्रपट आम्ही बेफिकीर दिं. २९ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.अशी माहिती चित्रपटाच्या टीमने कोल्हापूरात पत्रकार परिषदेत दिली.
या चित्रपटात सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही नवी जोडी दिसणार आहे. सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आले आहेत.मात्र आम्ही बेफिकीर या चित्रपटात पहिल्यांदाच हे दोन कलाकार दिसणार आहेत. तर राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.तसेच चित्तरंजन ढल यांनी कँमेरामन म्हणून तर श्राधेय केदार ,पंकज सळमुठे यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे. प्रणय अढांगळे यांनी चित्रपटाचे संगीत केले असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे,किर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या सुमधुर आवाजात या चित्रपटाची गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. तर खूप काही मिळवण्याच्या प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले. या आशयसुत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा आणि त्यांच्याच भाषेत बोलणारा हा चित्रपट आहे. म्हणूनच चित्रपटाचा लुकही यूथफूल आहे. आजपर्यंत काँलेज जीवनावर आधारित अनेक चित्रपट गेले असले तरी त्यात आम्ही बेफिकीर नक्कीच वेगळा ठसा उमटले.तर उत्तम कलाकार, धमाल कथा, चटपटीत संवाद आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला आम्ही बेफिकीर हा चित्रपट पाहून प्रेक्षकही आम्ही बेफिकीर म्हणतील यात शंका नाही. असा विश्वास चित्रपटातील कलाकारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला अभिनेता सुयोग गोऱ्हे,कविश्वर मराठे, राहूल पाटील, स्वप्नील काळे,अक्षय हांडके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *