महापुराच्या संकटातही कोल्हापूरकरानी जपली देशरक्षाबंधनातून देशभक्ती

[विवेकानंद ट्रस्ट कडून जवानांसाठी सव्वा लाख राख्याचे संकलन ]
कोल्हापूर /प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रात महापुराने थैमान घातले असतानाही , कारगिल युद्ध पासून सुरू असलेल्या रक्षाबंधन स्वामी विवेकानंदाच्या देशरक्षाबंधन सोहळ्याला आज जिल्ह्यातील शाळा महिला बचत गटांनी सव्वा लाख राख्या देऊन , आपल्या महापुराच्या संकटावेळीही सैनिकांची आणि देशभक्तीचे स्मरण ठेऊन आपली देशभक्तीच अधोरेखित केली आहे “” असे मत निवृत्त सुभेदार मेजर एन.एन.पाटील यांनी व्यक्त केले .ते बटालियन परिसरातील महादेव मंदिरात स्वामी विवेकानंद ट्रस्ट ने संकलित केलेल्या सव्वा लाखाच्या राख्या प्रदान समारंभात बोलत होते. प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना सचिव राजेंन्द्र मकोटे यांनी “भारतीय संस्कृतीत पारंपरिक बंधू प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाला सीमेवरील सैनिकासाठी एक राखी या उपक्रमाची देश रक्षाबंधन करणारे कोल्हापूर एक विधायक ओळख झाली आहे ” असे नमूद केले . यानंतर अध्यक्ष किशोर घाडगे यांनी ” जिल्ह्यात सर्वाधिक जवळ असलेल्या सैनिक टाकळी परिसरात सैनिक टाकळी गावाला पुराची झळ बसली आहे , लवाकरच विवेकानंद ट्रस्ट तर्फे त्यांना भरीव मदत केली जाईल “घोषित केले . टी ए बटालियन चे सुभेदार संजू पाटील यांनी ” आपल्या घरी महापुराचे पाणी आले असतानाही माता-भगिनी पाठवलेल्या राख्या यामुळे निश्चितच सैनिकांना नैतिक बळ मिळाले ” आहे असे भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. यावेळी कर्मवीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते नृत्यृ सादर केले शाळेच्या विद्यार्थिनी तसेच वीर माता आक्काताई मंडवाले , वीरमाता लक्ष्‍मीबाई साळवी, डाँ.सायली कचरे माजी नगरसेविका माघुरी किरण नकाते ,कला शिक्षीका सुनिता मेंगाणे, सैनिक कल्याण मंडळाच्या सुशीला नागावकर , ब्लर्डस स्कुल , कर्मेवीर इंग्लिश मँडीयम स्कुल च्या युवती यांनी प्रतिकात्मक जवानाना राख्या बांधल्या तसेच संकलित राख्याचे बॉक्स टी.ए.बटालियनच्या जवान सैनिकांकडे सीमेवर पाठविण्यसाठी प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर कीलकीले यांनी केले तर आभार महेश कामत यांनी म्हटले मानले.या सोहळ्यास शालेय विद्यार्थिनी शिक्षिकासह विविध बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *