शहरात विकासाची गंगा आणण्यासाठी प्रा.संजय मंडलिकाना विजयी करा : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर /प्रतिनिधी
पंचगंगा प्रदूषण, रंकाळा संवर्धन, बास्केट ब्रिज, विमानतळ आदी कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचे प्रश्न जैसे थे स्थितीत आहेत. खासदार या नात्याने केंद्र शासनाच्या आखत्यारीत येणाऱ्या या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी सर्वसामान्य जनतेची माफक अपेक्षा असताना, कोल्हापूरातील समस्यांची सोडवणूक करण्यापेक्षा गेल्या साडेचार वर्षात राजकीय स्टंटबाजी करणाऱ्या विद्यमान खासदारांना जनता धडा शिकवेल, अशी टीका करीत शहरात विकासाची गंगा आणण्यासाठी प्रा. संजय मांडलिक यांना विजयी करावे,असे आवाहन आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला. शिवसेना भाजप रिपाई रासप युतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ परिसरात आयोजित प्रचार फेरी प्रसंगी ते बोलत होते.
आज सकाळी प्रचार फेरीची सुरवात श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर येथे दर्शन घेवून आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, युवा नेते यशवर्धन मंडलिक यांनी केली. यावेळी “जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणा देत प्रचार फेरी परिसर दणाणून सोडला. यासह प्रा.संजय मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. पुढे ही प्रचार फेरी पुढे उत्तरेश्वर पेठ वाघाची तालीम चौक येथील श्री महादेव मंदिरात दर्शनाने होणार आहे. हि फेरी उत्तरेश्वर पेठ मेन रोड, शुक्रवार गेट पोलीस चौकी ,पंचगंगा तालीम, शुक्रवार पेठ, आखरी रास्त तरून मंडळ, जगतगुरु मठ, गुणे बोळ, धनवडे गल्ली, मस्कुती तलाव मार्गे उत्तरेश्वर पेठ येथे येवून समाप्त करण्यात आली.
यावेळी बोलतना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहराची वाढ झपाट्याने होत आहे. मुळचा पेठांचा भाग आणि उपनगरांचा विचार करता नागरिकांना मिळणाऱ्या सोईसुविधांच्या अभावासह शहराचे मुळचे प्रश्न गेले अनेक वर्षे आहे तसेच राहिले आहेत. आमदार या नात्याने शहरातील बऱ्याच समस्यांची सोडवणूक आपण केली आहे. ओपन जिम, तालीम संस्थाना निधी, चौक सुशोभिकरण, आदीं विकास कामे शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून केली आहेत. परंतु केंद्र शासनाच्या आखत्यारीत येणारे पंचगंगा प्रदूषण, रंकाळा संवर्धन, बास्केट ब्रिज, विमानतळ या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी या प्रश्नाची इत्यंभूत माहिती असणाऱ्या प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रचार फेरी प्रसंगी माजी नगरसेवक उदय जगताप, बाळासाहेब काटकर, अरुण सावंत, जॉन घाटगे, दीपक काटकर, रघुनाथ साळोखे, आण्णा पसारे, संजय गांधी योजनेचे किशोर घाटगे, शिवसेना उपशहरप्रमुख निरंजन खाडे, सनी अतिग्रे, मनोज घाटगे, पंकज पाटील, अनंत पाटील, शिवतेज सावंत, राकेश पवार, अजिंक्य शिद्रूक, अविनाश तोडकर, संग्राम मोरे, अक्षय बोडके आदी शिवसेना भाजप युतीचे पदाधिकारी व भागातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *