सीआयएएन हेल्थकेअर लिमिटेडचा एसएमई आयपीओ २ मे २०१९ रोजी उघडणार आणि ९ मे २०१९ रोजी बंद होणार

सीआयएएन हेल्थकेअर लिमिटेड (“सीआयएएन”) बुक बिल्डिंग पद्धतीद्वारे प्रत्येकी १० रूपयांच्या ६२१६००० पहिल्या आयपीओ प्रति समभाग ६१-६५ रूपयांमध्ये आणत असून सुमारे ३७.९२ कोटी ते ४०.४० कोटी रूपये जमा करण्यासाठी (खालच्या आणि वरच्या पातळीच्या किमतीत) प्रयत्न सुरू केले आहेत. हा इश्यू खरेदीसाठी २ मे २०१९ रोजी उघडेल आणि ९ मे २०१९ रोजी संपुष्टात येईल. किमान २००० समभागांसाठी आणि त्याच्या गुणकांमध्ये अर्ज सादर करायचा आहे. वितरण झाल्यावर समभाग बीएसई एसएमईवर नोंदणीकृत करण्यात येतील.
सीआयएएन ही डब्ल्यूएचओ-जीएमपी आणि आयएसओ-९००१:२०१५ प्रमाणित ट्रान्सनॅशनल उत्पादन कंपनी असून त्यात विविध प्रकारच्या फार्मास्युटिकल, न्यूट्रास्युटिकल, आयुर्वेदिक, कॉस्मेस्युटिकल्स, सेक्शुअल वेलनेस आणि फूड सप्लीमेंट उत्पादनांचा समावेश आहे. त्यांनी देशांतर्गत बाजारपेठांसाठी १००० पेक्षा अधिक रचना आणि २००० पेक्षा अधिक ब्रँड विकसित केले आहेत. त्यांनी निर्यातीसाठी ३५३ उत्पादने नोंदणीकृत केली असून आणखी ५८५ उत्पादनांसाठी अर्ज सादर केला आहे. सीआयएएनला व्हेटरनरी उत्पादनांसाठी विशेष परवाना मिळाला आहे. सीआयएएनच्या गोळ्यांची क्षमता मासिक ३५ कोटी गोळ्या, ५ कोटी कॅप्सूल्स, १५ लाख बाटल्या सिरप आणि ४० लाख ट्यूब कॉस्मेटिक्सपर्यंत वाढणार आहे.
ही कंपनी श्री. सूरज झनवर, सौ. कविता झनवर आणि श्री. पंकज झन्वर यांनी प्रवर्तित केली आहे. कंपनीच्या सल्ला आणि धोरण मंडळात डॉ. अरूण कुमार खन्ना (फार्मा उद्योगातील ख्यातनाम नाव), श्री. अनूप सूद (माजी अध्यक्ष मार्केटिंग, एमक्युअर फार्मास्युटकल्स लिमिटेड) आणि श्री. मोहित धांड यांचा समावेश आहे.
ही कंपनी विद्यमान कारखान्याच्या रूरकी- उत्तराखंड येथे स्थित युनिट १ (३.५० कोटी रूपये) सुधारणेसाठी, इश्यूतून आलेल्या निव्वळ उत्पन्नाचा वापर करण्याचे प्रस्तावित करत असून रूरकी येथे स्थित युनिट २ साठी मार्जिन मनी (७.२८ कोटी रूपये), ब्रँड बिल्डिंग (१.५० कोटी रूपये) ताबा आणि इतर धोरणात्मक उपक्रम (७.०९ कोटी रूपये), चालू भांडवल (१० कोटी रूपये) आणि उर्वरित रक्कम कॉर्पोरेट कारणासाठी वापरली जाणार आहे.
मागील तीन आर्थिक वर्षांत, सीआयएएनने उलाढाल/ निव्वळ नफा अनुक्रमे (आर्थिक वर्ष १६)साठी रूपये ४७.१६ कोटी रूपये/ १.३७ कोटी रूपये, ५१.८५ कोटी/ २.२४ कोटी (आर्थिक वर्ष १७) आणि ५९.५९ कोटी/ ३.७६ कोटी रूपये (आर्थिक वर्ष १८)साठी नोंदवला आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९च्या पहिल्या नऊ महिन्यांत त्यांनी ४४.४८ कोटी रूपयांच्या उलाढालीवर ५.२५ कोटी रूपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.
या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर फेडेक्स सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड आहेत, एनएनएम सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड हे मार्केट मेकर आहेत, एनएनएम नेक्स्टजेन एडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे सल्लागार आहेत, तर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *