कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती मदत व पुनर्वसन कार्याची भाजपा संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्याकडून आढावा मार्गदर्शन बैठक संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व व असाह्य करून सोडणारा महापूर येऊन गेला. या नैसर्गिक आपत्तीमध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकांचे प्रचंड हाल व नुकसान झाले आहे. या प्रसंगात सर्व समाज, संघटना व पक्ष यांनी मदत कार्य केले. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा व शहर यांनी या विपत्तीमध्ये अत्यंत प्रामाणीकपणे जनसेवा अहोरात्र केली असून अद्यापर्यंत सुरु आहे. या सर्व अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने भाजपा संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी आज कोल्हापूर बिंदू चौक येथील भाजपा जिल्हा कार्यालात जिल्हा व शहर पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची व्यापक बैठक घेतली या आढावा बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आम.सुरेश हाळवणकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा आमदार अमल महाडिक, म्हाडाचे अध्यक्ष समरजीतराजे घाटगे, भाजपा प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, भाजपा पश्चिम महाराष्ट्र सह संघटन मंत्री रविजी अनासपुरे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी बैठक घेतली.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये प्रशासनाच्यावतीने व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या कामाचा आढवा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सर्वांना सांगितला. पूरग्रस्त भागामध्ये यामध्ये प्रामुख्याने शिरोळ, गगनबावडा व कागल याठिकाणी केलेल्या मदतकार्याची माहती भाजपा संघटन सरचिटणीस बाबा देसाई यांनी सांगितली. भाजपा कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी पूर परिस्थिती मध्ये सर्व सामान्य लोकांना जिवनावश्यक वस्तू, अन्न, पाणी, औषध, चादर इत्यादी वस्तू त्यांच्या पर्यंत सतत व दररोज पुरवल्या. या विषयी मदत कार्याचे स्वअनुभव कथन सर्वांनी केले. यावेळी माणुसकी आणि संघटनेचा सेवाभाव या वाईट काळामध्ये लोकांना दिलासा देणारा ठरला असे सर्वांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, या पूरपरीस्थितीच्या काळात विशेष करून पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी मदत व पुर्नवसनाचे काम खूप चांगल्या पद्धतीने केले. प्रशासन व सरकार यांचे कामकाज सक्षम केले व लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले.

तसेच त्यांना सर्व जीवनावश्यक वस्तू वेळच्यावेळी पुरवण्याची व्यवस्था केली. पूरग्रस्त लोकांना त्या-त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवल्या. आता प्रशानाकडून पंचनामा करून नुकसान भरपाई दिली जात आहे याविषयी पालकमंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी दाखवलेली प्रशासकीय व्यवस्था वाखाणण्याजोगी आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना संघटन मंत्री विजय पुराणिक म्हणाले, पूर परिस्थितीमध्ये सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी खूप चांगले मदत कार्य केले याबद्दल प्रथम त्यांचे आभार मानले. यावेळा त्यांनी हे मदत कार्य येथून पुढे सुरु ठेवण्याचे आवाहन केले. लोकांचे घर-संसार उभे करण्याची नैतिक जबाबदारी पक्ष संघटना व कार्यकर्त्यांनी घ्यावी तसेच सरकार कडून अपेक्षित सहाय्यता व निरनिराळ्या व्यवस्था आणि योजना लोकांच्या पर्यंत पोचवण्याचे कार्य करावे जेणेकरून पूरग्रस्त लोकांना आधार मिळेल. भाजपाची विचारधारा व कार्यशैली ही नेहमी सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी व शांततेच्या मार्गाने जीवन जगण्याविषयी त्यांना प्रेरित करण्याची राहिली आहे या आधारे येत्या काळात सर्व कार्यकर्त्यांनी जबाबदारीने व सेवाभावी वृत्तीने लोकांची मदत करणे सुरूच ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. प्रसंगी सरकार व पक्ष ताकदीने मदत करत राहील असे त्यांनी नमूद केले.

यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, संतोष भिवटे, अॅड.संपतराव पवार, गणेश देसाई, मारुती भागोजी, दिलीप मेत्राणी, मामा कोळवणकर, विवेक कुलकर्णी, इकबाल हकीम, चेतन चव्हाण, विजय पाटील, गुरुदत्त शुगर्सचे राहूल घाटगे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, दीपक शिरगांवकर, नाथाजी पाटील, सुरेश बेनाडे, संदीप पाटील, कागलचे संजय पाटील, पी.डी.पाटील, मुकुंद गावडे, राजेंद्र देशमुख, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, आसावरी जुगदार, गायत्री राऊत, सुजाता पाटील, रविंद्र मुतगी, बापू राणे, दिलीप बोंद्रे, सुनिलसिंह चव्हाण, प्रबोध ताकवडे, प्रणीत कारंडे आदिसंह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!