Category: देश – विदेश

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल: २३जण बेपत्ता तर दोन मृतदेह सापडले

रत्नागिरी /प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरण ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने धरणाच्या पायथ्याशी असणारी लहान वस्तीच वाहून गेली. तर दोन मृतदेह सापडले असून २३जण बेपत्ता असल्याची भीती वर्तवण्यात आहे.दरम्यान घटनास्थळी एनडीआरएफ चे पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण पूर्ण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक […]

Continue Reading

कोल्हापूर जिल्हा परिषदेत आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात

कोल्हापूर/प्रतिनिधी :- कोल्हापूरात जिल्हा परिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी ६.३०ते८.३० पर्यंत योगाची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.दरम्यान योग शिक्षिका श्रीम. राजश्री पाटील यांनी योगासनाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकेव्दारे करुन घेतले व योगासन विषयी माहिती सांगितली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल , सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी […]

Continue Reading

स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियानास शासन सर्वोतोपरी सह- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकार्य करणार

मुंबई / प्रतिनिधी : स्वच्छ वारी, स्वस्थ वारी निर्मल वारी, हरित वारी हा उपक्रम अतिशय चांगला असून या उपक्रमामुळे वारीची पवित्रता वाढेल यासाठी शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंत्रालय समिती कक्षात आयोजित समर्थ भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना आळंदी ते देहू-पंढरपूर राष्ट्रीय दिंडी सल्लागार आयोजन समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री […]

Continue Reading

डोनेशन घेणाऱ्या शाळांवरील कारवाईचा अहवाल दोन दिवसांत द्या: अन्यथा शिक्षण उपसंचालक कार्यालयास टाळे ठोकू : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर /प्रतिनिधी :- कोल्हापूरात शालेय आणि महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली असून शिक्षण सम्राटांकडून मात्र डोनेशन, बांधकाम फी, शालेय साहित्य या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांची लूट होत आहे. यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे कोणतेही नियंत्रण नसून शिक्षण सम्राटांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे. दरवेळी शिवसेनेने आंदोलन केले कि शिक्षण उपसंचालक कार्यालयास जाग येते. गेल्या दोन वर्षात पालकांची […]

Continue Reading

जागतिक पर्यावरण दिन विशेष वृत्त

कोल्हापूर प्रतींनिधी ( नम्रता गाडे ) : – पर्यावरण हा विषय आज देशपातळीवर न राहता जागतिक पातळीवर त्याचा विचार केला जाऊ लागला आहे. पर्यावरणाच्या सुरक्षेच्या आणि संरक्षणाच्या हेतूने हा दिवस पूर्ण जागतिक पातळीवर साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र ने सामाजिक व राजकीय स्तरावर पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला जावा यासाठी सन […]

Continue Reading

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात राष्ट्रस्तरीय ‘मंदिर-संस्कृती रक्षण अभियान’ उभारणार !

पणजी (गोवा) – 27 मे ते 4 जून या कालावधीतील ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला भारतातील 25 राज्ये आणि बांगलादेश येथून एकूण 174 हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे 520 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनात हिंदूंच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्यांसह मंदिरांच्या सरकारीकरणाविषयी व्यापक चर्चा करण्यात आली. भारताची राज्यघटना ‘सेक्युलर’ असूनही सरकार हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन कसे काय […]

Continue Reading

हिंदु राष्ट्रासाठी संप्रदायांनी व्यापकता अंगीकारावी ! – पूज्य संतश्री (डॉ.) संतोषजी महाराज, महाराष्ट्र

रामनाथी (गोवा) – साधना आणि धर्मप्रसार यांचा सुंदर ताळमेळ अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात पहायला मिळत आहे. अधिवेशनस्थळी आल्यावर हिंदु धर्माची काळजी करणारे कोणीतरी आहे, हे पाहून आनंद वाटला. आर्थिक, तसेच अन्य कारणांमुळे सिंधी समाज राष्ट्र-धर्म कार्यापासून काही काळ दूर गेला होता; मात्र सध्या परिस्थिती पालटली असून हा समाजही राष्ट्र-धर्म कार्यात अग्रेसर आहे. हिंदु […]

Continue Reading

वन विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखा पूर्वीप्रमाणे पुन्हा विभागाकडेच

कोल्हापूर/प्रतिनिधी : वन विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढून पुन्हा वन विभागाकडे ठेवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे या शाखेतील नियुक्त्या, सेवाज्येष्ठता, पदोन्नती आदी बाबींबाबत निर्माण झालेली अडचण दूर होणार आहे. वन विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखा 22 मार्च 2005 च्या शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 1990 पासून पूर्वलक्षी प्रभावाने सार्वजनिक बांधकाम […]

Continue Reading

विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना विद्युत शुल्क माफीच्या सवलतीत वाढ

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यातील विदर्भ व मराठवाडा या औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागांचा विकास होण्यासाठी या विभागातील औद्योगिक घटकांना देण्यात येणारी विद्युत शुल्क माफीची सवलत पुढील पाच वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आज झालेल्या निर्णयानुसार विदर्भ, मराठवाड्यातील सर्व उद्योग घटकांना दिनांक 01.04.2019 ते 31.03.2024 पर्यंत म्हणजे पाच वर्षांच्या कालावधीसाठी विद्युत शुल्क माफीची सवलत […]

Continue Reading

दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात कृत्रिम पाऊस पाडणार

कोल्हापूर/प्रतिनिधी: राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून पर्जन्यवाढीसाठी एरियल क्लाऊड सीडिंगची (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी परिस्थ‍िती असून बहुतांशी भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. […]

Continue Reading