शिवसेनेतर्फे शहर परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचे वाटप

कोल्हापूर /प्रतिनिधी
गेले सात दिवस महापुराच्या विळख्यात अडकलेल्या आणि अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्याची सुटका होऊ लागली आहे. कोल्हापूर सह सांगली, शिरोळ आदी भागात पावसाने हाहाकार उडवून दिला. पुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये घुसले. या लोकांना सतर्क करून मदतकार्य आणि बचावकार्य करण्याचे काम शिवसेना व युवासेनेच्या टीमने केले आहे. शहरात ओढावलेल्या या महाप्रलयाने शुक्रवार पेठ, हरिओम नगर, नंदनवन पार्क, रमणमळा, मुक्तसैनिक वसाहत, जाधववाडी, बापटकॅम्प, कदमवाडी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आदी परिसरातील नागरिकांवर संकट ओढावलेले आहे.     
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटातुन बाहेर पडण्यासाठी हजारो मदतीचे हात सरसावले असुन, शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरेसाहेब व शिवसेना नेते युवासेना अध्यक्ष मा.आदित्यजी ठाकरेसाहेब यांच्या आदेशाने शिवसेनेकडुन भरघोस मदतीचा ओघ सुरु झाली आहे. शहरात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने शिवसेना पुरग्रस्त सहाय्यता केंद्र,दसरा चौक येथील सी.के.पी. बोर्डिंग येथे सुरु करण्यात आले आहे.या केंद्रातुन शहरातील पुरग्रस्त भागात मदत पोहोच केली जाणार आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तु,अन्नधान्य,कपडे,चादर आदि स्वरुपात हि मदत केली जाणार आहे.
या मदत वाटपाकरिता चार वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या असून, १२ टेम्पो द्वारे ही भरघोस मदत पहिल्या टप्प्यात शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. या चारही टीमचे काम आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, देवस्थान समिती कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर हे करणार आहे. याकरिता शहरातील पूरग्रस्त भागांचे पाच विभागात विभाजन करण्यात आले. तरी या मदत कार्यात समस्त शिवसैनिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *