ब्रेकिंग – आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरासह कारखान्यावंर आयकर विभागाचा छापा:राजकीय वर्तुळात खळबळ

कोल्हापूर/प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल मधील घरासह कारखान्यावंर आज पहाटे आयकर विभागाने छापा टाकल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे बडे नेते समजल्या जाणाऱ्या केडीसीसीचे अध्यक्ष तथा आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल मधील निवासस्थानी आज पहाटे आयकर विभागाची टीम दाखल झाली.तर त्यांच्या साखर कारखान्यांवर देखील आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे.तर आमदार हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील मुलाच्या घरासह टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्या ही घरावर आयकर विभागाचा छापा टाकल्याचे समोर आले आहे.
मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे आमदार मुश्रीफ यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचही दिसत आहे.
दरम्यान पालकमंत्री तथा भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरात काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात आमदार हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याच जाहीर निमंत्रण दिले होते. मात्र आमदार मुश्रीफ यांच्याकडून आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.तर अचानक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने आमदार मुश्रीफ यांच्या घरासह कारखान्यावंर टाकलेल्या धाडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून कारण अजून गुलदस्त्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *