भाजपा महिला मोर्चातर्फे “रक्षा बंधन पर्व” कार्यक्रमाचा शुभारंभ

कोल्हापूर /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने संपूर्ण राज्यभरात “रक्षा बंधन” पर्व साजरे करण्यात येणार आहे. रक्षा बंधन पर्वाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जवानांना राख्या पाठवण्यात येणार आहेत.
काल भाजपा जिल्हा कार्यालयात या “रक्षा बंधन” पर्व विषयासंदर्भात महिला मोर्चा पदाधिकारी यांची बैठक पार पडली. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातुन जास्ती जास्त महिलांबरोबर संपर्क साधून शासनाच्या योजना व सरकारचे काम यांची माहिती पोचवण्याचे आवाहन केले. संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी या कार्यक्रमाचे टप्पे समजावून सांगितले. यावेळी भारती जोशी, प्रभावती इनामदार, किशोरी स्वामी, सुलभा मुजूमदार, कविता पाटील, विद्या पाटील, रजनी भुर्के, प्रमोदिनी हर्डीकर, शारदा लोहार, शशिकला मोरे, सुनिता सूर्यवंशी, आसावरी जुगदार, मंगल निप्पानीकर, शोभा भोसले, लता बर्गे, विजयमाला जाधव, शोभा कोळी, शुभांगीनी चितारी, शांतादेवी मोरे आदिंसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
भाजपा कोल्हापूर महिला मोर्चाच्यावतीने कोल्हापूर शहरातील सर्व प्रभागांमध्ये “रक्षा बंधन” पर्व या कार्यक्रमासाठी महिला समिती तयार करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्षम सरकारने महिलांसाठी अनेक योजना उदा. उज्वला गॅस योजना, आवास योजना, मातृवंदना भोजन योजना, अस्मिता योजना सुरु केल्या आहेत. महिलांसाठी असणाऱ्या या कल्याणकारी योजनांची माहिती भाजपा महिला मोर्च्याच्या माध्यमातून घरो-घरी जाऊन देण्यात येणार आहे. रक्षा बंधन निमित्य आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व भारतीय जवांनांना राखी देण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राखी देणाऱ्या महिलेला मुख्यमंत्री यांचे पत्र ओवाळणी म्हणून देण्यात येणार आहे.
दिनांक २० जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान हा कार्यक्रम बूथ निहाय राबण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदार संघातून जवळपास २० हजार राख्या संकलीत करण्याचा प्रयत्न असणार आहे. या राख्या मंडल निहाय एकत्रित करण्यात येणार आहेत. या “रक्षा बंधन” पर्व कार्यक्रमाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा निहाय संयोजिका व सहसंयोजीका यांच्याशी ११ जुलै रोजी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑडियो ब्रीजद्वारे संवाद साधणार आहेत.
भाजपा कोल्हापूर महिला मोर्चाच्यावतीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन होण्यासाठी १६ जुलै रोजी प्रशिक्षण आयोजित केले आहे. तसेच भाजपाच्या ७ मंडलांमध्ये हा कार्यक्रम सर्व बूथ मध्ये मोठया उत्साहात राबण्यात येणार आहे. तसेच महिला बचत गट, मान्यवर व्यक्ती, भाजपा बूथ सदस्य यांच्याघरामधून देखील राख्या संकलित करण्यात येणार आहेत त्याचबरोबर सर्व समाज समूहांमधून देखील राख्या संकलित करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व क्षेत्रातील महिलांशी संपर्क साधता येणार आहे.

या संकलित केलेल्या सर्व राख्या मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयाकडे पाठवल्या जाणार आहेत. १४ ऑगस्ट रोजी मुंबई मध्ये भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महिला प्रतिनिधी त्यांच्या स्थानिक व पारंपरिक वेषभूषेमध्ये उपस्थित राहणार आहेत. अशा भव्य मेळाव्या मध्ये या महिला प्रतिनिधींच्या हस्ते मा.मुख्यमंत्री यांना राखी बांधण्यात येणार आहे.
तरी कोल्हापूर महानगर मधील जास्तीत जास्त महिलांनी या “रक्षा बंधन” पर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपा महिला मोर्च्याच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!