भाजपाचे कै.सुभाष वोरा यांची शनिवारी सर्वपक्षीय शोकसभा

कोल्हापूर /प्रतिनिधी
ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तै आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान सामितीचे विद्यमान सदस्य सुभाष वोरा यांच्या पार्थिवावर आज सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांचेअंतिम ईच्छेनुसार त्यांच्या भगिनी आशा स्वामी सह भाचा – दत्तक पुत्र विवेक ने अग्नीसंस्कार केले. रक्षाविर्सजन शनिवारी सकाळी नऊ वाजता होणार असून यांच दिवशी पाच आँक्टोंबर रोजी सांयकाळी पाच वाजता करवीर नगर वाचन मंदिर मध्ये सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. जनसंघापासून ते भाजपाच्या जिल्हा तसेच राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून त्यांनी प्रर्दीघ काळ काम केले होते.यासह कोल्हापूर महानगर पालिका स्थायी समिती सभापती सह एस .टी.महामंडळाचे ही ते सदस्य होते., हिंदू व्यासपीठ सह करवीर नगर , सेवा भारती आदी संघटनाचे ते सदस्य होते.खासदारपदाची निवडणूक ही त्यांनी लढवली होती. त्यांच्या अंत्ययात्रेत आमदार अमल महाडीक , आमदार सतेज पाटील , नगरसेवक सत्यजित कदम – अजित ठाणेकर, चंद्रकांत जाधव , नेशन फस्ट चे केशव गोवेकर, अनिरुध्द कोल्हापूरे ,ऋतुराजर क्षीरसागर आदीसह विविध संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!